भारतात क्रिकेट हा एक खेळ नसून, तो एक उत्सव असतो. भारतीय क्रिकेट टीममध्ये प्रत्येक वर्षी नवीन खेळाडू येतो. आपले कौशल्य दाखवतो आणि काही वर्षांनी निघून जातो. संघात असा क्वचितच एखादा खेळाडू असतो ज्याला प्रत्येक पिढीने तेवढाच आदर दिला आणि त्याला ‘क्रिकेटचा देव’च मानले. याच क्रिकेटच्या देवाच्या जीवनावर आधारित सचिन- अ बिलियन ड्रिम्स हा सिनेमा आहे. खऱ्या सचिनला जवळून भेटण्याची संधी हा सिनेमा देतो.

हा सिनेमा साराच्या जन्मापासूनच सुरू होतो. तुम्ही सचिनचे चाहते नसाल तरीही हा सिनेमा तुम्हाला एकदा तरी थिएटरमध्ये ‘सचिन…. सचिन…’ असे ओरडायला भाग पाडतो, हेच या सिनेमाचे खरे श्रेय आहे. हा सिनेमा बघताना तुमच्या अंगावर काटा येतो, तुम्ही पोट धरून हसता आणि तुम्ही काही प्रसंगांमुळे रडताही…

ravi-kishan-salman-khan
“मी सलमानपासून दूरच…” रवी किशन यांनी सांगितला ‘तेरे नाम’च्या सेटवरील अनुभव
a child girl crying and insists to her mother for husband
“मला नवरा पाहिजे” रडत रडत चिमुकलीने केला आईकडे हट्ट, व्हिडीओ एकदा बघाच…
anup-soni-crime-patrol
अनुप सोनीने ‘क्राईम पेट्रोल’ का सोडलं? अभिनेता स्पष्टच बोलला; म्हणाला, “मी फार अस्वस्थ…”
Watch film rupees 99 friday offer PVR INOX movies theater 99 rs ticket movie offer in theater inox offer pvr offer cinema lovers day ९९ रुपयांमध्ये आवडीचा चित्रपट पीव्हीआर आयनॉक्स सिनेमा लव्हर्स डे
फक्त ९९ रुपयांमध्ये पाहता येणार तुमच्या आवडीचा चित्रपट; ‘सिनेमा लव्हर्स डे’च्या निमित्ताने आहे खास ऑफर

लहान असताना डब्यामध्ये बेडूक आणणारा सचिन, रमाकांत आचरेकरांकडे प्रशिक्षण घेणारा ते सारा, अर्जुनला पहिल्यांदा हातात घेताना घाबरलेला सचिन बघताना खूप मजा येते. सचिन आणि अंजलीने लग्न करण्याचा विचार केला त्यावेळी सचिन घरी सांगायला घाबरत होता. अखेर, अंजलीच त्याच्या घरी गेली आणि ‘सचिनला माझ्याशी लग्न करायचं आहे,’ असं सांगून टाकलं. हे सर्व छोटे छोटे प्रसंग थिएटरमध्ये बघताना पोट धरून हसायला येतं. तर काही प्रसंग भावूक करून जातात. टेंशनमध्ये असल्यावर सचिन बप्पी लहरी यांचं कोणतं गाणं दिवसभर ऐकायचा हे कळल्यावर प्रेक्षक पोट धरूनच हसतील यात काही शंका नाही.

वाचा : प्रिमियरमध्ये कलाकारांच्या मांदियाळीतही सचिनचे सारावरच लक्ष

मॅच फिक्सिंग, द्रविड- लक्ष्मण यांची अप्रतिम खेळी, गांगुलीचे टी-शर्ट काढून नाचणे, वर्ल्ड कप मॅच, वेंकटेश प्रसाद आणि आमिर सोहेल यांचा किस्सा, शेन वॉर्न आणि सचिनमधील टक्कर, शारजा कप हे सगळं नव्यानं बघताना एक क्रिकेटप्रेमी भारावून नाही जाणार तरच नवल. वयाच्या २३ व्या वर्षी सचिनला कर्णधारपद दिल्यामुळे नाराज झालेले काही वरिष्ठ खेळाडू यांच्यावरही या सिनेमात भाष्य करण्यात आलेय. त्यात अझरुद्दीन आणि सचिन यांच्यातील कर्णधारपदाच्या वादावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. पण हा वाद संक्षिप्त स्वरूपात दाखवला नाही याची कट्टर सचिन फॅनला रुखरुख लागू शकते. वरकरणी हा वाद दाखवून संपवला असेच हा सिनेमा बघताना जाणवते. याशिवाय विनोद कांबळी या त्याच्या मित्राबद्दलही सिनेमात फारसे काही दाखवले नाही. सचिनच्या वडिलांचं निधन आणि तरीही अगदी दुसऱ्याच दिवशी वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी गेलेला सचिन हा प्रसंग मनात कुठे तरी दीर्घकाळ राहतो. खेळाडूंचं आयुष्य हे वाटतं तितकं नक्कीच सोपं नसतं हे या प्रसंगातून प्रकर्षाने जाणवतं. तसेच वर्ल्डकप मिळवण्यासाठीची त्याची २२ वर्षांची तपश्चर्या खूप काही शिकवून जाते.

वाचा : ‘सचिनसारखा क्रिकेटपटू असलेल्या देशात जन्मल्याचा अभिमान’

एखाद्या खेळाडूच्या जीवनावरची डॉक्युमेंट्री कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे सचिनचा हा सिनेमा आहे. वांद्र्याच्या साहित्य-सहवासपासून सुरू झालेला सचिनचा प्रवास रिटायरमेंटपर्यंतच त्याचं आयुष्य यावर या सिनेमात प्रकाश टाकण्यात आलाय. थोडक्यात सचिनचा जीवन प्रवास यात दाखवण्यात आला आहे, असं जरी आपण म्हटलं तरी हा फक्त एका माणसाचा प्रवास नाही, त्याच्या या प्रवासात त्याच्या यशासाठी सर्वस्व देणारा त्याचा भाऊ, आई- वडील, पत्नी यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच या सिनेमात नक्की सचिन हिरो आहे की त्याच्या पाठी भक्कमपणे उभे राहणारे त्याचे कुटुंब आणि मित्र परिवार हे हिरो आहेत हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो.
यात भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूमचे वातावरणही पाहायला मिळते. संघ जेव्हा सामना जिंकतो किंवा हरतो तेव्हा खेळाडूंची मनःस्थिती कशी असते याची जवळून माहिती मिळते. त्यामुळे सिनेमात वापरण्यात आलेले फुटेज फार बोलके आहे. ते फुटेजच तुम्हाला खिळवून ठेवते. हा सिनेमा पाहताना आपल्या देशात क्रिकेट का एवढा मोठा खेळ आहे याची पुन्हा एकदा जाणीव होते. रिअल फुटेजमधून हा सिनेमा बनवला असल्यामुळे सचिनच्या आयुष्याच्या जवळ जाता येतं असंच म्हणावं लागेल. सिनेमाचे संकलन या खूप महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. या सिनेमाचं संपूर्ण श्रेय जर कोणाला द्यायचं झालं तर ते दिग्दर्शक जेम्स अर्स्किन यांनाच द्यावं लागेल यात काही शंका नाही. ज्यापद्धतीने त्यांनी हा डॉक्यू-ड्रामा तयार केला आहे याला उपमा नाही असेच म्हणावे लागेल.

अथक मेहनत आणि खेळावर नितांत प्रेम करणाऱ्या सचिनचं २२ यार्डाच्या मैदानातलं २४ वर्षांचं आयुष्य पाहणं हा नक्कीच एक वेगळा अनुभव असेल आणि तो अनुभव सचिनचे चाहते घेतीलच…

सिनेमाचे नाव- सचिन: अ बिलियन ड्रीम्स
दिग्दर्शक- जेम्स अर्स्किन
कलाकार- सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, सारा तेंडुलकर, अर्जुन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, सुनील गावस्कर, महेंद्र सिंग धोनी

मधुरा नेरूरकर
madhura.nerurkar@indianexpress.com