सचिनच्या जबरा फॅनने केला चित्रपटाचा अख्खा शो बुक…

सचिनच्या चाहत्यांना वाटली मोफत तिकिटे

सचिन तेंडुलकरचा क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाताना चाहते ज्या तयारीने जात होते. अगदी तशीच तयारी करून त्याच्या जीवनावर आधारित चित्रपट सचिन अ बिलियन ड्रिम्स  पाहण्यासाठी चाहत्यांनी चित्रपट गृहामध्ये एण्ट्री केली. हे शक्य झाले आहे पिंपरी चिंचवडमधील सचिनच्या जबरा चाहत्यामुळे…. बाबा भोईर असं या जबरा फॅनचे नाव आहे. हातात देशाचा तिरंगा, गालावर पेंट केलेला तिरंगा आणि सचिनच्या नावाचे टीशर्ट घालून चाहते पीव्हीआर सिनेमाज थिएटरमध्ये अवतरले. त्यामुळे मॉलच क्रिकेटचं मैदान असल्याचा भास येथील चित्रपट रसिकांना काही काळ झाला होता.

वाचा : आता राज्यात ‘सचिन- अ बिलियन ड्रिम्स’ करमुक्त

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सुधीर कुमार हा सर्वात मोठा चाहता आहे. हे आपल्या सर्व क्रिकेट चाहत्यांना माहित आहे. तो नेहमीच सचिन तेंडुलकर याचा क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी अगदी वेळेवर पोहचायचा. विशेष म्हणजे त्याच्या शरिरावरती देशाचा तिरंगा पेंट केलेला असायचा. तर छातीवर सचिन तेंडुलकर हे नाव लिहिलेलं असायचं. असाच जबरा फॅन हा पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळाला. पण, यावेळी निमित्त होते ते सचिन अ बिलियन ड्रिम्स या चित्रपटाचे.

बाबा भोईर यांनी तर २८० सीट्स असलेला चित्रपटाचा अख्खा शोच बुक केला आणि केक कापून सेलिब्रेशन केले. विशेष म्हणजे त्यांनी विकत घेतलेली ही तिकीटं नंतर सचिनच्या चाहत्यांमध्ये मोफत वाटली.

whatsapp-image-2017-05-27-a