अभिनेत्री सई ताम्हणकरचा वजनदार हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या काही दिवसांमध्ये तिचे सतत येणारे सिनेमे, त्याचे चित्रिकरण मग प्रमोशन यांमुळे सई फारच व्यग्र होती. वजनदार सिनेमानंतर ती लगेचच तिच्या आगामी सिनेमाचे चित्रिकरण सुरु करेल असे वाटत होते. पण ती मात्र मुंबईत नव्हतीच. अचानक सई कुठे गेली हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता.

खरं तर सततच्या कामामुळे तिने या सगळ्यापासून थोडा ब्रेक घेतला आहे. ती उत्तरांचलला फिरायला गेली आहे. उत्तरांचलच्या निसर्गरम्य वातावरणात सईने चांगलीच धमाल केली आहे. काही खास मित्र- मैत्रिणींसोबत सई उत्तरांचलमधील, सोनापानी आणि बरेली या ठिकाणांना भेट देऊन आली आहे. हिमालयाच्या कुशीत रिलॅक्स होण्यासाठीच तिने ही ट्रीप केली असेल यात काही शंका नाही. हिमालयाच्या त्या सुंदर वातावरणात जाऊन तिथल्या निसर्गाला भेट देऊन फारच छान वाटलं असेल.

BJP and TMC
पश्चिम बंगालमध्ये टीएमसी अन् भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानावेळी राडा; एकजण गंभीर जखमी
south east central railway recruitment 2024 Job opportunities in south east central railway
नोकरीची संधी : ‘दक्षिण पूर्व मध्य रेल्वे’मधील संधी
South Central Mumbai
दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांत धुसफूस, शिवसेनेकडून प्रचार फेऱ्यांना सुरुवात
two women fighting for seats in Delhi bus shocking video goes viral on social media
‘सीट’वरून दोन महिलांमध्ये तुफान राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, VIDEO होतोय व्हायरल

दरम्यान, निर्माती विधि कासलीवालच्या ‘लॅन्डमार्क’ फिल्म्सच्या’ प्रदर्शित झालेल्या ‘वजनदार’ ह्या चित्रपटाचे महाराष्ट्राबरोबरच अमेरिकेतही जोरदार ‘वजन’ पडत आहे. लेखक-दिग्दर्शक सचिन कुंडलकर ह्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांना स्वतःवर प्रेम करायला शिकवणारा असून, चित्रपटाच्या या सुंदर विषयामुळे भारताबाहेरही चित्रपटाला जोरदार  मागणी आली आहे. मुळातच शरीराने  बारीक असणे म्हणजेच सुंदर अशी समाजात मानसिकता असताना, हा चित्रपट स्वतःबद्दल वेगळा विचार करायला प्रवृत्त करतो. स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःची काळजी घ्या हा विचार खूप परिमाणकारकपणे मांडला आहे.

अमेरिकेतील बे एरिया आणि शिकागो येथे दाखवण्यात आलेला हा चित्रपट तेथील लोकांना खास भावला असून, लोकाग्राहस्तव अमेरिकेतील, डेनवर, डेट्रॉइट, सियाटल, लॉस ऐन्जेलिस, कोलम्बस, हडसन आणि डल्लास या शहरांमध्येसुद्धा शोजचे आयोजन करण्यात आले आहे. असाच एक शो कतारमध्ये सुद्धा झाला आणि त्याला देखील भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. ११ नोव्हेंबरला वजनदार प्रदर्शित झाला होता.