चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेस अंगठय़ाला दुखापत झाल्यामुळे अभिनेता सैफ अली खान याला शनिवारी कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे त्याच्या अंगठय़ावर किरकोळ शस्त्रक्रियाही करण्यात आली असल्याचे ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटले आहे.

सैफ अलीवर उपचार करून त्याला एक-दोन दिवसांत घरी सोडण्यात येणार आहे. सैफची प्रकृती ठीक असल्याचे त्याची बहीण सोहा हिने सांगितले.

सैफ अली खान याने नुकतेच ‘रंगून’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेस सैफच्या हाताला दुखापत झाली होती. तर ‘एजंट विनोद’ या चित्रपटातील एका साहसी दृश्याच्या चित्रीकरणाच्या वेळीही तो जखमी झाला असल्याचे या बातमीत म्हटले आहे.