प्रत्येक वडिलांना आपला मुलगा आपल्या सारखाच असावा अशी अपेक्षा असते. अभिनेता सैफ अली खानच्या बाबतीतही असेच काहीसे घडत आहे. ‘रंगून’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आलेला  बॉलिवूडचा नवाब अभिनेता सैफ अली खान सध्या चर्चेत आहे ते म्हणजे त्याच्या मुलामुळे. तैमुरच्या जन्मानंतर बऱ्याच कारणांनी सैफिना चर्चेत आले होते. तैमुरसोबतच सैफला आता चर्चेत आणले आहे ते म्हणजे त्याच्या मुलाने. म्हणजेच इब्राहिम खानने. इब्राहिम खान सोशल मीडियावर काही प्रमाणात सक्रिय असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने सोशल मीडियावर एक लाइव्ह सेशन केले होते. या सेशनमध्ये इब्राहिम त्याच्या फॉलोअर्सच्या प्रश्नांना उत्तरं देत होता. प्रश्नोत्तरांच्या याच सत्रादरम्यान इब्राहिमने त्याच्या अभिनयाची झलकही दाखवली.

अभिनेता शाहरुख खानच्या ‘रईस’ या चित्रपटातील एक संवाद म्हणत इब्राहिमने किंग खानची नक्कल केली. ‘अम्मी जान कहती है..कोई धंदा छोटा नही होता और धंदे से बडा कोई धर्म नही होता’, हा संवाद इब्राहिम म्हणत आहे. बॉलिवूड लाइफच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअरही करण्यात आला आहे. सैफचा मुलगा इब्राहिम सोशल मीडियावर सक्रिय असण्यासोबतच त्याच्या कुटुंबासोबत वेळ व्यतीत करण्यालाही तो महत्त्व देतो. काही सेलिब्रिटींनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांनाही तो हजेरी लावतो.

ibrahimsaifalikhan2-1

अभिनेता सैफ अली खान आणि त्याचा मुलगा इब्राहिम खान यांच्या चेहरेपट्टीत बरेच साम्य आहे. अनेकांनी तर त्याला तरुणपणीचा सैफ असेही म्हटले आहे. सध्या इब्राहिम बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार की नाही याबाबत संभ्रम असला तरीही त्याच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही. दरम्यान सैफची मुलगी सारा अली खान तिच्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. पण, सारा नेमकी कोणत्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार ही बाब अद्यापही गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/BP2n8Rijz6r/