अनेकदा आपल्यासोबत एखादी घटना घडलीच नसती तर आयुष्य किती सुकर झालं असतं असा प्रश्न नेहमीच पडतो. माणूस वर्तमानात जगण्यापेक्षा जर… तर… मध्ये अधिक जगतो. अनेकदा प्रतिकूल परिस्थितीला जर तरची जोड देऊन त्यातून पळ काढण्याचा प्रयत्न करतो. असंच जर ‘सैराट’ सिनेमाच्या बाबतीत झालं असतं तर…? असा एक विचार केला असता अनेक गोष्टी डोळ्यांसमोर येतात. ‘सैराट’ सिनेमाने आतापर्यंत काय कमवलं किंवा या सिनेमात काम करणाऱ्या टीमला काय मिळालं यापेक्षाही जर हा सिनेमा आलाच नसता तर काय झालं असतं असा विचार तुम्ही कधी केलाय का? या पुढील १० गोष्टींना ‘सैराट’चे प्रेक्षक नक्कीच मुकले असते.

१. प्रेक्षकांना आर्ची आणि परश्या अर्थात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर ही दोन सर्वसामान्य नावं कधीच कळली नसती. ‘सैराट’ने अशा चेहऱ्यांना ओळख दिली ज्यांनी कधीही कलाकार होण्याची स्वप्नही पाहिली नव्हती.

chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
Shash Mahapurush Rajyog
३० वर्षांनी ‘शश राजयोग’ बनल्याने ‘या’ तीन राशी होणार प्रचंड श्रीमंत? शनिदेवाच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो पैसाच पैसा
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप
Rape on 11 year girl
पाचवीतल्या मुलीवर बलात्कार आणि हत्या, दत्तक आई वडिलांचं क्रूर कृत्य

२. फक्त रिंकू आणि आकाशच नाही तर आर्चीची मैत्रिण आनी अर्थात अनुजा मुळ्ये, आर्चीचा मामे भाऊ मंग्या म्हणजे धनंजय ननावरे, परश्याचे दोन्ही जवळचे मित्र सल्या म्हणजे अरबाज शेख आणि लंगड्या म्हणजे तानाजी गलगुंडे हे चेहरे कधी कोणाला दिसलेच नसते. त्यांनाही प्रेक्षकांनी तेवढंच डोक्यावर घेतलं जेवढं रिंकू आणि परश्याला घेतलं.

३. सोलापूरमधलं करमाळा गाव आणि त्यातली नयनरम्य दृश्य कोणाला पाहता आली नसती. अनेकांनी ती आधीही पाहिली असतील पण सिनेमॅटोग्राफरच्या नजरेतून आलेली ती दृश्य अनेकांच्या डोळ्यांसमोर आजही दिसत असतील. त्याचमुळे ही ठिकाण आज पर्यटनस्थळही बनली आहेत. वाळलेल्या झाडाचंही स्वतःचं असं सौंदर्य असतं हे ‘सैराट’मुळे सर्वांना कळलं.

४. ज्या गोष्टीमुळे ‘सैराट’ अधिक हिट झाला अशी या सिनेमातली गाणी खास लॉस एंजेलिसमधील सोनी एमजीएम स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करण्यात आली. आतापर्यंत या स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करण्यात आलेल्या सिनेमांमध्ये पहिला भारतीय सिनेमा म्हणून ‘सैराट’चे नाव कोरले गेले. या सिनेमामुळे अजय-अतुलचे नाव फोर्ब्सच्या यादीत आले होते.

५. मराठी सिनेसृष्टीत कोणत्याही सिनेमाने आतापर्यंत ९० कोटीपेक्षा जास्त कमाई केली नव्हती. ‘सैराट’ आला नसता तर मराठी चित्रपटसृष्टीला हा रेकॉर्ड बनवता आला नसता.

वाचा : #SairatMania : ‘आर्ची-परश्याला का मारलं, ते नागराजला विचारा..’

६. ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये रिंकूला स्पेशल ज्यूरी अवॉर्डने गौरविण्यात आले. तसेच स्पेशल मेन्शन (फिचर फिल्म) साठीही ‘सैराट’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

७. हा सिनेमा तेव्हा एवढा गाजत होता की, प्रेक्षकांच्या मागणीवरून रात्री ३ वाजताचाही ‘सैराट’चे शो लावले जायचे. ‘सैराट’ आलाच नसता तर प्रेक्षक या अनुभवालाही मुकले असते.

८. कपिल शर्माच्या शोमध्ये जाण्याचा पहिल्या मराठी सिनेमाचा मानही सैराटलाच मिळाला. त्या एपिसोडचा टीआरपी हा त्याच्या इतर एपिसोडच्या टीआरपीपेक्षा जास्त होता.

९. ऑनर किलिंगसारखा गंभीर विषय इतक्या प्रखरपणे नागराज मंजुळेने मांडला की शहरात राहणाऱ्यांनाही त्याचा दाह जाणवला.

१०. ‘सैराट’ सिनेमाने प्रसिद्धीची सगळी समीकरणचं बदलली. आता प्रत्येक सिनेनिर्मात्याला ‘सैराट’ सिनेमाचे जसे प्रमोशन करण्यात आले तसेच आपल्याही सिनेमाचे व्हावे असे वाटते.

‘सैराट’ आला नसता तर अजून काय झालं असतं हे तुम्हीही आम्हाला कळवू शकता. तसंच #SairatMainia तुम्हाला कसा वाटतोय… तुमच्या काय आठवणी आहेत… ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा… loksatta.express@gmail.com या ईमेल आयडीवर…