बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांच्याभोवती असणारं प्रसिद्धीच वलय हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आपल्या आवडत्या कलाकाराबाबत अधिकाधिक जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. रुपेरी पडद्यावर अभिनय करणारे कलाकार पडद्यामागे माणूस म्हणून कसे आहेत हे जाणून घेण्यास कोणाला नाही आवडणार. त्यामुळे आज अशाच सेलिब्रिटींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी सामाजिक जाणीव म्हणून मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. सुष्मिता सेन, प्रिती झिंटा, सलीम खान यांसारख्या अनेक बॉलिवूड सेलेब्रिटींनी मुले दत्तक घेतली आहेत. जाणून घेऊया कोण आहेत हे सेलिब्रिटी.

वाचा : जाणून घ्या, मराठी कलाकारांचे मानधन

मिथुन चक्रवर्ती यांना नमाशी, मिमो आणि रिमो हे तीन मुलगे आहेत. मात्र, मुलीची कमतरता भासणा-या मिथुन यांनी लहान परिला दत्तक घेतले. दिशानी ही त्यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे.

mithun-chakraborty

रविना टंडन हिने छाया आणि पूजा या दोन मुलींना दत्तक घेतले आहे. त्यातील छायाचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले.

4-raveena-tandon

दिग्दर्शक कुणाल कोहली आणि त्याची पत्नी रविना यांनी एका मुलीला दत्तक घेतले असून तिचे नाव राधा असे ठेवलेय.

107filmmakerkunalkohli

प्रीती झिंटाने एक दोन नव्हे तर तब्बल ३४ मुलींना दत्तक घेतले आहे. ऋषिकेशमधील अनाथालयातील मुलींना प्रितीने दत्तक घेतले आहे. या सर्व मुलींच्या शिक्षण आणि पालनपोषणाकडे प्रिती जातीने लक्ष देते.

वाचा : सुव्रत-मृण्मयीच्या ‘लग्ना’चा फोटो पाहिलात का?

m_id_419219_preity_zinta1

प्रसिद्ध लेखक सलीम खान आणि हेलन यांनी अर्पिताला दत्तक घेतले होते. अर्पिताने आयुष शर्मा याच्याशी विवाह केला असून त्यांना एक मुलगा आहे.

maxresdefault-1

दिग्दर्शक निखील अडवाणी आणि त्याची पत्नी सुपर्णा यांनी किया या मुलीला दत्तक घेतले आहे. कियाला जेव्हा निखिलने दत्तक घेतले तेव्हा ती चार वर्षांची होती.

nikhil

दिग्दर्शक सुभाष घई यांनी मेघनाला ती लहान असताना दत्तक घेतले होते.

q0hze4cjjd0bfw9c

गेल्यावर्षीच दिग्दर्शक रोहित शेट्टीने कॅन्सर पेशंट्स अँड असोसिएशनच्या दहा कॅन्सरपीडित मुलांना दत्तक घेतले.

rohitshetty-759

सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक संदीप सोपारकर याने लग्नापूर्वीच २००७ साली अर्जुनला दत्तक घेतले.

sandeep-soparkar

माजी विश्वसुंदरी सुष्मिता सेन हिला तिच्या पहिल्या दत्तक मुलीसाठी कायदेशीर लढा द्यावा लागला होता. एखाद्या अविवाहीत महिलेने मुलीला दत्तक घेण्याची ती पहिलीच घटना होती. अखेर हा कायदेशीर लढा तेव्हा सुष्मिताने जिंकला. सुष्मिताने रिनी आणि अलिसा या दोन मुलींना दत्तक घेतले आहे.

sushmita-sen_640x480_71463029433