ईद आणि इफ्तार पार्टी म्हटल्यावर बाबा सिद्दीकी आणि सलमान-शाहरूख हे जणू समीकरणच बनलंय. सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला अनेक बॉलीवूड तारकांची उपस्थिती असते. मात्र, यापेक्षा पार्टीत सलमान आणि शाहरुख यांची एकत्र भेट होणे याचीच चर्चा सर्वत्र असते. यावर्षी मात्र बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीला सलमान – शाहरूख एकत्र आले नाहीत. सलमानला आपली कथित प्रेयसी लुलिया वंतूरसोबत या पार्टीमध्ये पाहिलं गेलं आणि सलमान आणि लूलियाचं एकत्र या पार्टीला येणं हा सर्वांच्याच चर्चेचा विषय बनला.

सलमानच्या कुटुंबियांनी आयोजित केलेल्या जवळपास सर्वच कार्यक्रमांना लूलिया आवर्जुन हजेरी लावते. शिवाय सलमान, लूलियाला याआधीही बऱ्याच कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहण्यात आले आहे. आता बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीलाही दोघांना एकत्र पाहिल्यानंतर पुन्हा एकदा या दोघांमधल्या नात्याची सर्वत्र चर्चा होताना दिसतेय. रोमानियन ब्यूटी लूलिया यावेळी सलवार सूटमध्ये अत्यंत सुंदर दिसत होती. पार्टीमध्ये लूलियाची अभिनेत्री प्रिती झिंटासोबत विशेष मैत्री दिसून आली.

whatsapp-image-2017-06-24-at-9-16-26-pm

whatsapp-image-2017-06-24-at-9-16-36-pm

whatsapp-image-2017-06-24-at-8-45-38-pm

वाचा : जान्हवी कपूरचा ‘लव्ह ट्रँगल’?

मागील वर्षी सलमान खान आणि शाहरूख खान एकत्र बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीला उपस्थित होते. यावेळी एकमेकांना मिठी मारताना हे दोघे माध्यमांच्या कॅमेरामध्ये टिपले गेले. दोघांच्या चाहत्यांसाठी हा एक अविस्मरणीय क्षण होता. यावर्षी मात्र सलमान-शाहरूखने चाहत्यांची निराशा केली. कारण या पार्टीमध्ये दोघे एकत्र दिसलेसुद्धा नाहीत. सलमान लूलिया वंतूर आणि ‘ट्युबलाइट’मधील बालकलाकार माटिन रे तंगूसोबत दिसला तर शाहरूखने मात्र पार्टीला एकटाच आला.

whatsapp-image-2017-06-24-at-9-59-55-pm whatsapp-image-2017-06-24-at-9-59-56-pm-1

whatsapp-image-2017-06-24-at-8-26-36-pm whatsapp-image-2017-06-24-at-8-26-50-pm whatsapp-image-2017-06-24-at-8-45-37-pm

whatsapp-image-2017-06-24-at-8-45-40-pm

whatsapp-image-2017-06-24-at-9-16-27-pm whatsapp-image-2017-06-24-at-9-16-32-pm

वाचा : बॉलिवूडच्या ‘सुलतान’ला लोळवत फेसबुकवर विराटच अव्वल

या इफ्तार पार्टीला नेहमीप्रमाणेच बॉलिवूडच्या अनेक तारकांनी हजेरी लावली. ‘ट्युबलाइट’चे दिग्दर्शक कबीर खान आपली पत्नी मिनी माथूरसोबत या कार्यक्रमाला पोहोचले. याशिवाय हुमा कुरेशी, सूरज पंचोली, सोनू सूद, इलियाना डिक्रूझ आणि सोहेल खानने सुद्धा बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावली.