अभिनेता सलमान खान आणि त्याच्या विविध चित्रपटांमध्ये त्याच्यासोबत काम करणारे सहकलाकार यांच्यात नेहमीच एक खास नाते तयार झाल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. त्यातही नवोदित कलाकारांवर सलमानचा वरदहस्त असतो असे म्हणायला हरकत नाही. नवोदित कलाकारांना चित्रपटसृष्टीमध्ये सहजतेनं वावरता यावं यासाठीही सलमान नेहमीच त्यांच्या पाठीशी उभा असतो. सलमान खानच्या आगामी ‘ट्युबलाइट’ या चित्रपटातील अभिनेत्री झू झू हिला एक खास भेट दिली आहे. कबीर खान दिग्दर्शित ‘ट्युबलाइट’ या चित्रपटामध्ये अभिनेता सलमान खानसोबतच झू झू ही चिनी अभिनेत्रीसुद्धा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सलमान सोबत स्क्रिन शेअर करण्यासाठी झू झू फारच उत्साही होती हे तिच्या सोशल मीडियावरिल पोस्ट्समुळे अनेकांच्या लक्षात आलेच असेल. पण, सध्या मात्र तिने व्यक्त केलेला आनंद एका वेगळ्याच कारणासाठी आहे. झू झूने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिला मिळालेल्या एका भेटवस्तूचा फोटो शेअर केला आहे.

‘फ्रॉम द खान ऑफ खान्स’, अशा कॅप्शनसह झू झूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिला मिळालेल्या या खास भेटवस्तूचा एक फोटो पोस्ट केला आहे. सलमाने झू झूला भेट म्हणून गणपतीची एक सुरेख मूर्ती दिली आहे. झू झू या चित्रपटासाठीचे तिचे चित्रिकरण संपवून मायदेशी परतली आहे. झू झू चीनमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून याआधी तिने ‘वॉट वुमेन वाँट’, ‘शांघाय कॉलिंग’ यांसारख्या चित्रपटांमधूनही ती झळकली आहे. त्यामुळे सलमान खान आणि झू झू यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्येही याबाबतची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

From the khan of khans

A photo posted by Zhu Zhu (@zhuzhuclubheaven) on

सलमान खानच्या या आगामी चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खानही पाहुण्या कलाराच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरुखने नुकतेच या चित्रपटासाठीचे चित्रिकरण पार पाडले आहे. सलमान आणि शाहरुख खान बऱ्याच वर्षांनी कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटामध्ये पुन्हा एकत्र झळकणार असल्यामुळे त्याचा चित्रपटाला नक्कीच फायदा होणार असेच दिसत आहे.

And… It’s a wrap! missing all of you already ….

A photo posted by Zhu Zhu (@zhuzhuclubheaven) on

Amazing party amazing hosts @kabirkhankk @minimathur thank you for such a memorable night

A photo posted by Zhu Zhu (@zhuzhuclubheaven) on