बॉलिवूडमधील दबंग सलमान खान याच्यासोबत काम करणे हे अनेक अभिनेत्रींचे स्वप्न असते. असे असताना बॉलिवूडमधील या लोकप्रिय खानला बॉलिवूडमध्ये एक काळ गाजविलेल्या जून्या अभिनेत्रीसोबत काम करायचे आहे. ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणाऱ्या श्रीदेवीसोबत काम करण्याची सलमानची इच्छा आहे. सलमान खान अभिनयासोबत सध्या चित्रपट निर्मितीमध्येही सक्रिय झाला आहे. विपूल शहा दिग्दर्शित चित्रपटाचे सलमान खान निर्मिती करणार आहे. या  चित्रपटामध्ये श्रीदेवीने काम करावे यासाठी सध्या प्रयत्न करत आहे. यासंदर्भात त्याने श्रीदेवीची भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

आई आणि मुलगा यांच्या नात्यावर आधारित चित्रपटामध्ये श्रीदेवीने काम करावे, यासाठी सलमान खान प्रयत्नशील आहे. या चित्रपटाचे कथानक श्रीदेवीला आवडले आहे. मात्र श्रीदेवीने चित्रपटात काम करण्याबात कोणतीही अधिकृतपणे होकार दिलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विपूल शाह या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून श्रीदेवीने या चित्रपटास होकार दिल्यास पुढील वर्षी या चित्रपटाच्या चित्रिकरणास सुरुवात होईल. महिला प्रदान चित्रपटामध्ये श्रीदेवीला एका आईच्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली आहे.  या चित्रपटात नवाज्जुद्दिन सिद्दकी विशेष भूमिकेत दिसणार असल्याचे समजते. अभिनेता सलमान खान आणि कुटुंबियांनी नुकताच अभिनेत्री हेलन यांचा वाढदिवस साजरा केला. हेलन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये वांद्र्यातील सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये अभिनेत्री श्रीदेवी, तिची मुलगी जान्हवी, बोनी कपूर यांनी हजेरी लावली होती.

swatantra veer savarkar budget
रणदीप हुड्डाने ज्यासाठी मालमत्ता विकली, त्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाचं मूळ बजेट किती? जाणून घ्या
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

श्रीदेवी ही सुपरस्टार हा किताब मिळविणारी पहिली अभिनेत्री आहे. १९७८ मध्ये ‘सोलवा सावन’ या चित्रपटाततून तिने बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून पदापर्ण केले. श्रीदेवी आणि जया प्रदा यांच्यात तेव्हा चुरस होती. जितेंद्र बरोबर ‘हिंमत्तवाला’, ‘घर संसार’, ‘तोहफा’ आणि ‘मवाली’ यांसारखे काही हिट चित्रपट दिले आहेत. तेव्हाची श्रीदेवी ही सगळ्यात महागडी अभिनेत्री होती. बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले तेव्हा श्रीदेवीला हिंदी येत नव्हते. तेव्हा तिचे डबिंग दुसरे करायचे. श्रीदेवीने आपल्या संवादांसाठी पहिल्यांदा ‘चांदनी’ या चित्रपटात डबिंग केले होते.  या प्रसिद्ध अभिनेत्रीने २०१२ मध्ये ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागम केले . या चित्रपटाला चांगली पसंती देखील मिळाली होती. त्यामुळे श्रीदेवीचे चाहते आता तिच्या आगामी चित्रपटाची नक्कीच उत्सुकतेने वाट पाहतील. नव्वदीच्या दशकात ‘चांद का तुकडा’ आणि ‘चंद्रमुखी’ या हिंदी चित्रपटात श्रीदेवी सलमानच्या नायिकेच्या भूमिकेत दिसली होती.