अभिनेता सलमान खानची बहिण अर्पिता शर्मा हिचा मुलगा अहिल हा ‘खान’दानातील सर्वात लहान सदस्य आहे. सलमानचा हा सर्वात छोटा भाचा आज एक वर्षाचा झाला असून, त्याच्या वाढदिवासाच्या सेलिब्रेशनचा खास बेत आखण्यात आलाय. अहिलच्या पहिल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी सलमान खान चक्क २२ तासांचा प्रवास करुन मालदिवला पोहोचला आहे. संपूर्ण खान कुटुंब आणि जवळची मित्रमंडळी अहिलच्या वाढदिवसासाठी मालदिवला पोहोचली आहेत. अर्पिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

https://www.instagram.com/p/BSPKpsGj8Ud/

खान मंडळींच्या या सेलिब्रेशन पार्टीमध्ये सलमान खानची कथित प्रेयसी लुलिया वंतुर देखील सहभागी होणार असल्याचे समजते. सलमान खान त्याच्या आगामी ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाच्या चित्रीकरणातून वेळ काढून भाच्याच्या सेलिब्रेशनसाठी मालदिवला पोहोचला आहे. अहिलच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी खान कुटुंबिय मालदिवला पोहोचले असून अर्पिता खान शर्मा, तिचा नवरा आयुष शर्मा, अरबाज खान, सोहेल खान, सलमान खानचे वडील सलीम आणि आई सलमा खान व हेलन हे मालदिवला गेले आहेत. अरबाज खान आणि मलायका अरोरा एकमेकांपासून वेगळे झाले असले तरी, बऱ्याचदा हे दोघही अशा कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात. त्यामुळे अहिलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. याशिवाय बॉलिवूडमधील सलमानची खास मित्रमंडळी या कार्यक्रमामध्ये दिसू शकतात. एकुणच सलमान आपल्या भाच्याचा पहिला वाढदिवस धम्माकेदार करणार असेच म्हणावे, लागेल.

https://www.instagram.com/p/BSPJ2_djwEc/

सलमानला लहान मुलं किती आवडतात हे वेगळं सांगायला नको. खान कुटुंबातील सर्व लहान मुलं त्याची लाडकी आहेत. यापूर्वी अनेकदा भाचा अहिलवरिल प्रेम व्यक्त करताना तो दिसला आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या भाच्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी सलमान खास तयारी करणार नाही असे होईल का? यापूर्वी सलमान खान चक्क भाच्याला सूत्रसंचालन कसे करावे, याचे धडेही देताना दिसला होता.

https://www.instagram.com/p/BSOb1YuDL3j/

https://www.instagram.com/p/BSOYr0QD4eP/