भाईजान सलमान खानच्या बॉलिवूड वर्तुळातील सहकाऱ्यांसोबतच्या संबंधाबाबत नेहमीच चर्चा रंगताना दिसते. या क्षेत्रात येणाऱ्या नवख्या कलाकारांपासून ते चित्रपटातील निर्माता आणि दिग्दर्शक या सर्वांसोबत सल्लूमियाचे भाईचाराचे संबंध असल्याचे पाहायला मिळते. त्यातीलच एक नाव म्हणजे बॉलिवूड वर्तुळातील निर्माता आणि दिग्दर्शक साजिद नाडियादवाला. साजिद यांची पत्नी वद्राने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सलमान आणि तिच्या चिमुकल्या मुलाचा फोटो शेअर केला आहे. सुभान आपल्या सलमान चाचूसोबत असल्याचा उल्लेख वद्राने पोस्टमध्ये केल्याचे दिसून येते. साजिद आणि सलमान यांच्यामधील नातेसंबंध घट्ट असल्याचेच या फोटोतून सिद्ध होते.

[jwplayer aWZVIg6a]

साजिद यांच्या पत्नीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केलेला फोटो २००४ मध्ये ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटाच्या मुहूर्तावेळीच्या काढलेला होता. हा फोटो पाहून वद्राने भूतकाळातील आठवणींना या फोटोच्या माध्यमातून उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे.  या फोटोमध्ये सलमान खान चिमुकल्या सुभानला काखेत घेऊन उभा असल्याचे दिसते. सलमानने साजिदसोबत ‘मुझसे शादी करोगी’, ‘किक’ यासारख्या  चित्रपटातून  काम केले आहे. नेहमीप्रमाणेच सलमानच्या या दोन चित्रपटांनी देखील बॉक्सऑफिसवर धमाका केला होता. निर्माता म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवास करणाऱ्या साजिद नाडियादने ‘कीक’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटात सलमान खान प्रमूख भूमिकेत दिसला होता. तर सलमानबरोबर जॅकलीन फर्नांडिसने स्क्रिन शेअर केली होती.

तब्बल पाच वर्षानंतर नव्वदीच्या दशकातील ‘जुडवा’ या चित्रपटाच्या सिक्वलमधून साजिद आणि डेविड धवन ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जुडवा’ या ‘ब्लॉकबस्टर’ चित्रपटात करिश्मा सलमान खानसोबत झळकली होती. त्यानंतर आता ती लवकरच ‘जुडवा २’ या आगामी चित्रपटात पुन्हा एकदा सलमानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे अशी चर्चा सध्या होत आहे. डेविड धवन दिग्दर्शित ‘जुडवा २’ या चित्रपटात वरुण धवन सोबत सलमान खान दिसणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते.

[jwplayer 71ydKhFE]

अभिनेता सलमान खान आणि त्याच्या विविध चित्रपटांमध्ये त्याच्यासोबत काम करणारे सहकलाकार यांच्यात नेहमीच एक खास नाते तयार झाल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. सलमान खानने आगामी ‘ट्युबलाइट’ या चित्रपटातील अभिनेत्री झू झू हिला एक खास भेट दिल्याचे नुकतेच समोर आले होते. कबीर खान दिग्दर्शित ‘ट्युबलाइट’ या चित्रपटामध्ये अभिनेता सलमान खानसोबतच झू झू ही चिनी अभिनेत्रीसुद्धा मुख्य भूमिकेत झळकणार आहे.