बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याचा चिमुकल्या भाच्याचे एक गोंडस छायाचित्र शेअर केले आहे. चिमुकला अहिल त्याची आजी सलमा खान यांच्या मांडीवर पहुडलेला छायाचित्रात पाहायला मिळतो. ‘सलमा नानी आणि नन्हा अहिल’, या मथळ्यासह सलमानने हे छायाचित्र इंस्टाग्रामवर शेअर केले.
सलमान आपल्या भाच्याच्या संगोपनासाठी नेहमी सजग असतो. त्याने स्वत: अहिलच्या देखभालीसाठी मदतीनीसांच्या मुलाखती देखील घेतल्या होत्या. याआधीही सलमानने अहिलसोबतचे छायाचित्र शेअर केले होते. याशिवाय, सलमानने आपल्या भाच्याला बीएमडब्ल्यू देखील भेट म्हणून दिली होती.

Salma Nani and Nanha Ahil .

A photo posted by Salman Khan (@beingsalmankhan) on