सलमान खान आणि त्याचं मराठी भाषेवर असणारं प्रेम सर्वांनाच माहिती आहे. आई मराठी असल्यामुळे जेव्हा शक्य होईल तेव्हा तो मराठी भाषेत काम करण्याचा प्रयत्न करत असतो. आता भाईजान अभिनयासोबतच गाण्याच्या क्षेत्रातही उतरला आहे. त्याने गायलेले ‘किक’ सिनेमातले गाणेही फार गाजले होते. प्रेक्षकांना आपले गाणे आवडते हे पाहून त्याने ‘हिरो’ या सिनेमातही गाणे गायले. आता तर सलमानने चक्क मराठी सिनेमासाठी गाणं गायलंय. महेश मांजरेकर दिग्दर्शित आगामी ‘एफयू- फन अनलिमिटेड’ सिनेमात सलमानने गायलेले ‘गच्ची’ हे गाणे आता प्रदर्शित झाले आहे.

कश्मिरा शहा, आकाश ठोसर, मयुरेश पेम, वैदेही परशुरामी, संस्कृती बालगुडे, सत्या मांजरेकर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं थोडं वेगळ्या धाटणीचं आहे. सलमानने जरी हे गाणे गायले असले तरी अतिरंजक बनवण्याच्या नादात ‘से बँड’चे मूळ गाणेच चांगले होते असे प्रकर्षाने जाणवते. किशोर प्रधान यांची झलकही या गाण्यात दिसते. हे गाणे ऐकताना गाण्याला सलमानचा आवाज अजिबात सूट होत नाही असेच सतत वाटत राहते. सलमानच्या आवाजाची जादू हिंदी सिनेमांमध्ये जरी दिसली असली तरी मराठीमध्ये मात्र तो सपशेल अपयशी ठरला असेच म्हणावे लागेल.

boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
A bone stuck in a tiger's teeth
भक्ष्यावर ताव मारताना वाघाच्या दातात अडकले मोठा हाडाचा तुकडा; हातोड्याने….,थरारक व्हिडीओ एकदा बघाच
puppy rescue
माणुसकीला सलाम! दोन भिंतीच्यामध्ये अडकलं कुत्र्याचं पिल्लू; भिंत फोडून काढले बाहेर, पाहा Viral Video
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

दरम्यान, या सिनेमासंदर्भात महेश मांजरेकर आणि ‘झी स्टुडिओ’ यांच्यात मतभेद झाल्याने या सिनेमाची निर्मिती करण्यास त्यांनी नकार दिला होता. अखेर मांजरेकरांनी ‘टी सीरीज’ कंपनीला या सिनेमाचे हक्क विकले.