28 August 2016

News Flash

सलमान खानचा शाहरूखला पुन्हा चिमटा

जाहिरातीच्या चित्रिकरणादरम्यान एका प्रसंगात चेह-यावरील हावभाव व्यवस्थित नसल्याने पुन्हा तो प्रसंग करावा, या विनंतीवरून

प्रतिनिधी | February 5, 2013 1:32 AM

जाहिरातीच्या चित्रिकरणादरम्यान एका प्रसंगात चेह-यावरील हावभाव व्यवस्थित नसल्याने पुन्हा तो प्रसंग करावा, या विनंतीवरून दबंग सलमानने पुन्हा शाहरूखला चिमटा काढला आहे. 
सत्तेचाळीस वर्षीय अभिनेता सलमान खान मुंबईत एका जाहिराचीच्या चित्रिकरणादरम्यान, त्याला पुन्हा चालण्यास सांगितले असता तो म्हणाला, ‘जर फक्त चालायचेच होते, तर कोणत्यातरी मॉडेलला घ्यायचं होतं, माझी गरज काय होती?’
त्यानंतर आपल्या मागणीवर अडून बसलेल्या दिग्दर्शकाने सलमानला अतिजवळच्या शॉटसाठी चेह-यावर आणखी हावभाव देण्याची विनंती केली तेव्हा तो म्हणाला की, ‘जर अभिनयच करायचा आहे, तर ह्रतिक रोशनला बोलवायचं होतं.’
पण इथेच तो थांबला नाही आणि तो म्हणाला, ‘आणि जर ओवर अॅक्टींगच करायची होती तर शाहरूखला बोलवायचं होतं.’

First Published on February 5, 2013 1:32 am

Web Title: salman khan targets shah rukh khan again