'सनम तेरी कसम' चित्रपटात 'हाल-ए-दिल' गाण्याचा वापर करून चित्रपटाच्या दिग्दर्शक जोडीने बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानची नाराजी ओढवून घेतली आहे. 'तेरे नाम' चित्रपटात सलमान जे गाणे वापरणार होता त्याच गाण्याचा वापर दिग्दर्शक विनय सप्रु आणि राधिका राव यांनी 'सनम तेरी कसम' चित्रपटात केला आहे. या दिग्दर्शक जोडीने सलमान खानचा अभिनय असलेल्या 'लकी : नो टाईम फॉर लव्ह' चित्रपटाचेदेखील दिग्दर्शन केले होते. 'तेरे नाम' चित्रपटासाठी निवडण्यात आलेले 'हाल-ए-दिल' हे आपले गाणे 'सनम तेरी कसम' चित्रपटाच्या दिग्दर्शक जोडीने हिमेश रेशमियाकडून चोरल्याचा संदेश टि्वटरवर पोस्ट करून सलमान खानने दिग्दर्शकांवरील आपली नाराजी व्यक्त केली. सलमान खान हा आमचा मार्गदर्शक असून आमच्या कामाची सर्व माहिती त्याला देत असल्याचे सांगत आपली बाजू स्पष्ट करताना विनय सप्रु म्हणाले, चित्रपट कसा झाला आहे ते सलमान खानला दाखवत असताना 'हाल-ए-दिल' गाणे आले आणि हे गाणे आपले असल्याचे म्हणत सलमान नाराज झाल्याची माहिती त्यांनी दिली. २००३ साली प्रदर्शित झालेल्या 'तेरे नाम' या सलमान खानच्या चित्रपटात 'हाल-ए-दिल' गाणे वापरण्यात येणार होते याची माहिती आपल्याला संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमियाने दिल्याचे सप्रु पुढे म्हणाले. हे गाणे सलमानसाठी तयार करण्यात आले होते. परंतु त्याच्यासाठी अन्य गाण्याची निर्मिती करण्यात आली आसून, भविष्यात सलमान खान 'तेरे नाम'सारख्या चित्रपटाची निर्मिती करेल तेव्हा त्या गाण्याचा वापर करता येईल असे हिमेशने सांगितले. आमच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच सलमान आमच्यासाठी भाग्यशाली असल्याने आम्ही 'हाल-ए-दिल' गाणे चित्रपटात वापरण्याचा निर्णय घेतल्याचे सप्रु म्हणाले. सुरुवातीला काहीसा नाराज असलेल्या सलमान खानच्या डोळ्यात गाणे पाहिल्यानंतर अश्रू तरळल्याचं त्यांनी सांगितल. 'सनम तेरी कसम' चित्रपटात तेलगु अभिनेता हर्षवर्धन राणे आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकॅन ही प्रमुख जोडी आहे. Directors of my film Lucky n Sanam Teri Kasam churaud my song from Himesh. lovely song Had selected it for Tere Naam — Salman Khan (@BeingSalmanKhan) February 3, 2016