सेलिब्रिटींचे ब्रेकअप, घटस्फोट, अफेअर्स या सर्व गोष्टी २०१७च्या सुरुवातीला पाहायला मिळाल्या. आता या वर्षाअखेर एक प्रसिद्ध सेलिब्रिटी कपल विवाहबंधनात अडकणार आहे. हे कपल म्हणजे दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य आणि त्याची प्रेयसी समंथा रुथ प्रभू. दोघेही सध्या आयुष्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहेत. चित्रपटसृष्टीत त्यांच्या लग्नाविषयी चर्चा सुरू असतानाच चाहत्यांना दोघांच्या लग्नासंबंधी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता आहे. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या समंथाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तिने परिधान केलेला लेहंगा आणि त्याखाली दिलेली कॅप्शन वाचून हा तिच्या लग्नातील ड्रेस असल्याचं कळतंय.

हा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये समंथाने लिहिलं की, ‘प्रतिभावान, मनाने सुंदर अशी कोणती व्यक्ती असेल तर ती म्हणजे माझी मैत्रीण क्रेशा बजाज. माझ्या लग्नातील पोशाखासाठी जर मी कोणावर विश्वास ठेवू शकेन तर ती क्रेशाच आहे.’ समंथाच्या साखरपुड्यातील साडीसुद्धा क्रेशानेच डिझाइन केली होती.

https://www.instagram.com/p/BZIjp1-g1vQ/

https://www.instagram.com/p/BZNj1V8AXKl/

BIG BOSS 11 : लाइव्ह एपिसोड पाहण्यासाठी या स्पर्धकाला ओळखा

सहा आणि सात ऑक्टोबर रोजी गोव्यात समंथा आणि नागा चैतन्यचा विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यानंतर हैदराबादमध्ये मोठा रिसेप्शन समारंभ असेल. नागा चैतन्य आणि समंथा यांच्या लग्नासाठी गोव्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये सर्व व्सवस्था करण्यात आली असून आता सर्वांनाच या दिमाखदार सोहळ्याची प्रतिक्षा लागून राहिली आहे.