पुणेकर आणि त्यांच्या पुणेरी पाट्या यावर आतापर्यंत अनेक विनोद झाले आहेत. पुण्यात गेल्यावर कोणत्याही रस्त्यावर किंवा दुकानावर पुणेरी शैलीतल्या पाट्या हमखास पाहायला मिळतात. आतापर्यंत या पुणेरी पाट्यांवर अनेक विनोदही आले आहेत. पुणेकर आणि त्यांची बोलण्याची पद्धत याचं आश्चर्यही वाटतं. नुकताच अभिनेता सौरभ गोखलेनेही फेसबुकवर एक दिनविशेष लिहीला.

या दिनविशेषाची खासियत म्हणजे हा पुणेरी बाजात लिहिलेला दिनविशेष आहे. यात तो म्हणतो की, एखादा विदेशी माणूस जर पुण्यात आला तर त्याला गैरसमज होऊ शकतो की पुण्यात बाळाच्या जन्मासोबतच महानगरपालिकेकडून टूव्हिलरही मिळते. याआधीही त्याने अशीच एक पोस्ट फेसबुकवर टाकली होती, त्यात स्वानुभवातून त्याने त्याची ती पोस्ट लिहिली होती असेच वाटते.

सौरभने लिहिलं की, पुण्यात इच्छुक व्यक्तींना वधु-वर निश्चित मिळतील. परंतु गाडी पार्किंगला जागा मिळणार नाही. आता सौरभला पुण्यात गाडी पार्क करायला जागा मिळाली नाही म्हणून त्याने खरेच वैतागून ही पुणेरी पाटी फेसबुकवर शेअर केली आहे की अजून काही तरी वेगळंच कारण आहे हे मात्र सौरभलाच माहित. सध्या सौरभ संत ज्ञानेश्वर या मालिकेच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. यात तो संत ज्ञानेश्वरांच्या प्रमुख भूमिकेत दिस आहे. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी ही मालिका कलर्स वाहिनीवर लागते.