नुकतंच ‘फोर्ब्स’ मासिकाद्वारे जगातल्या महागड्या अभिनेत्रींमध्ये दीपिका पदुकोनचे नाव समाविष्ट झाले होते. आता सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांची नावेही जाहीर झाली आहेत. यात शाहरुख खान, अक्षय कुमार, सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहे. तर या यादीच्या अग्रस्थानी ड्वेन जॉनसन याचे नाव आहे. प्रियांका चोप्रा ‘बेवॉर्च’ या तिच्या पहिल्या हॉलिवूड सिनेमामध्ये ड्वेन जॉनसन या कलाकाराबरोबर पदापर्ण करणार आहे.
यावर्षी सगळ्यात जास्त मानधन कमवणारे जगातल्या २० अभिनेत्यांमध्ये बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची वर्षाची कमाई ३.३ कोटी डॉलर्स असून या यादीत तो आठव्या स्थानी आहे. त्याच्याबरोबर याच स्थानी रॉबर्ट डाउनी ज्युनिअरही आहे. तर अक्षय कुमार ३.१५ कोटी डॉलर्स कमाईबरोबर अभिनेता रॉबर्ट पिट याच्यासोबत १० व्या स्थानी आहे.
तर दुसरीकडे ‘सुलतान’ सिनेमाच्या घवघवीत यशानंतर सलमान या यादीत २.८५ कोटी डॉलर्सची कमाई करत १४ व्या स्थानावर आहे. तर लिओनार्डो दिकॅप्रिओ हा सलमानपेक्षा एक स्थान खाली आहे. त्याची यावर्षाची कमाई २.७ कोटी डॉलर असून तो १५ व्या स्थानी आहे. तर बॉलिवूडचे शहेनशहा आमिताभ बच्चन यांची वर्षाची कमाई २ कोटी डॉलर असून ते १८ व्या स्थानी आहेत.