शनिवारी रात्री मुंबई विमातळावर अभिनेता शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खानला पाहिलं गेलं. यावेळी बापलेकाच्या या जो़डीने सर्वांचंच लक्ष वेधलं. विशेष म्हणजे दोघांनीही एकसारखेच कपडे घातले होते. दोघांनीही पांढरा टी-शर्ट आणि काळ्या रंगाचा जॅकेट घातला होता.

आर्यन अगदी बाबांसारखाच दिसतो हे दाखवणारे अनेक फोटो चाहत्यांनी सोशल मीडियावर याआधी शेअर केले. मात्र दोघांचाही हा नवीन फोटो पाहून आर्यन शाहरुखची ‘कार्बन कॉपी’ आहे असं म्हणायला हरकत नाही. आर्यन परदेशात त्याचं उच्च शिक्षण पूर्ण करतोय. अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया’मध्ये तो शिक्षण घेत असून दोघंही अमेरिकेसाठीच निघाले असल्याचं म्हटलं जातंय. मुलांच्या शिक्षणाबाबत शाहरुख खूप गंभीर आहे. आर्यनने त्याचं शिक्षण पूर्ण केल्यानंतरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करावं अशी शाहरुखची इच्छा आहे.

PHOTOS : मीरा आणि मिशासोबत शाहिदचा ‘व्हेकेशन मोड ऑन’

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच आर्यनचा चाहतावर्ग निर्माण झालाय. त्याला लाँच करण्यासाठी उत्सुक असल्याचं दिग्दर्शक करण जोहरने काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. आर्यनला पडद्यावर बघण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत.