बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान सध्या अनुष्का शर्मासोबत लिस्बन येथे ‘द रिंग’ चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात व्यग्र आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या सेटवरील अनेक छायाचित्रे सोशल मिडीयावर पाहावयास मिळत आहेत. त्यावरून आता या चित्रपटातील गाणे चित्रीत होत असल्याचे कळते. यात या दोन्ही कलाकारांमधील रोमॅण्टिक केमिस्ट्री पाहावयास मिळेल.
सलग सुरु असलेल्या चित्रीकरणातून वेळ काढत चित्रपटातील कलाकार आणि इतर मंडळी ब-याचदा मजामस्ती करताना दिसतात. ‘द रिंग’च्या सेटवर घडलेल्या ब-याचशा मजेशीर गोष्टी इन्स्टाग्रामवर पाहावयास मिळत आहेत. कधी एक महिला शाहरुखच्या पाठीवरून उडी मारताना दिसते. तर कधी शाहरुख लहान मुलाप्रमाणे रेलिंगवरून खाली घसरताना दिसतो. हे सर्व कमी होते की काय आता शाहरुखच्या खाण्याच्या सवयीदेखील बदललेल्या दिसतात. लंच ब्रेकदरम्यान शाहरुखने एका वेगळ्याच पदार्थावर ताव मारलेला दिसतोय. त्याने त्याच्या लंचचा एक फोटो सोशल मिडीयावर शेअर केला असून त्यास कॅप्शन दिलेय की, सेटवरील लंच ब्रेक. पण दिसायला भयानक आणि तीन हृदय असलेला पदार्थ कोणी कसा खाऊ शकतो..
लिस्बन येथे चित्रीकरणाला सुरुवात करण्यापूर्वी ‘द रिंग’ चित्रपटाचे चित्रीकरण युरोपमधील प्राग आणि अॅम्सटरडॅम या शहरांमध्ये झाले. यानंतरही युरोपमधील काही भागांमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अली करत असून यात शाहरुख टूरिस्ट गाईडच्या तर अनुष्का गुजराती मुलीच्या भूमिकेत दिसेल.

Lunch break on set. But how do u eat sumthing that looks so scary & has 3 hearts!

A photo posted by Shah Rukh Khan (@iamsrk) on

When it rains umbrellas…

A photo posted by Shah Rukh Khan (@iamsrk) on