शाहरुख खान त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत व्हेकेशनला गेला होता. पण ‘जब हॅरी मेट सेजल’ सिनेमाच्या प्रमोशनमुळे व्हेकेशनवरुन तो एकटाच भारतात परतला. शाहरुखची पत्नी गौरी मुलगी सुहाना आणि मुलगा अब्राम मात्र तिथेच थांबून सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. गौरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आपल्या दोन मुलांसोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये आर्यन मात्र कुठेच दिसत नाही, त्यामुळे तो या व्हेकेशनला गेला होता की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

…असं काय बोलली कतरिना की एवढा लाजला सलमान खान

तिघेही लॉस एंजेलिसच्या मालिबू बीचवर आराम करताना दिसत आहेत. या फोटोमध्ये लक्षवेधी गोष्ट म्हणजे सुहानाचा बोल्ड अंदाज. सुहाना निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसते आहे, तर अबराम आपल्याच जगात रमलेला दिसतोय. तिघांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. या फोटोला अगदी थोड्याच वेळात लाखो लाइक्स आणि शेअर्सही मिळाले.

https://www.instagram.com/p/BXBieIRglf6/

कामाच्या व्यापातून शाहरुखला जेवढाही वेळ मिळतो तो संपूर्ण वेळ कुटुंबियांसोबतच घालवणेच तो पसंद करतो. एका मुलाखतीत त्याने स्पष्ट केले होते की, कुटुंबासोबत बाहेर फिरायला जायला फार कमी मिळते. मी जेव्हा बाहेर जातो तेव्हा मी माझ्या परिवाराला घेऊन जात नाही. कारण मी एक स्टार आहे, त्यामुळे साहजिकच मी जिथे जाणार तिथे गर्दी होणार. या गर्दीची गेली २५ वर्षे मला सवय झाली आहे. तशी त्यांनाही या गर्दीची सवय झाली आहे, पण तरीही प्रत्येकवेळी त्यांनी या सर्व गोष्टींना सामोरं जावं असं मला वाटत नाही. आता माझी तिन्ही मुलं या सगळ्याला सरावली आहेत. माध्यमांसमोर कसं वागावं हे त्यांना कळलंय असंही तो म्हणाला.

https://www.instagram.com/p/BW5-T5DgGyE/

दरम्यान, शाहरूख सध्या त्याच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. लवकरच तो आणि अनुष्का शर्मा चला हवा येऊ द्याच्या सेटवरही येणार आहेत. अनुष्का या सिनेमात एका गुजराती मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे तर शाहरुख टूर गाइडची भूमिका करतोय. इम्तियाझ अली दिग्दर्शित हा सिनेमा येत्या ४ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. शाहरुखच्या या सिनेमाकडून त्याच्या प्रेक्षकांना फार अपेक्षा आहेत.

https://www.instagram.com/p/BXBtDJojShl/