देसी गर्ल प्रियांका चोप्राची अमेरिकन टिव्ही शोमध्ये वर्णी लागल्यानंतर आता बादशहा शाहरुख खान अमेरिकन टिव्ही शोमध्ये झळकणार आहे. सायन्स फिक्शन डिटेक्टीव शो- डिर्क जेंटली होलिस्टिक डिटेक्टिव एजन्सी’ साठी शाहरुखला निमंत्रण आले आहे. विशेष म्हणजे ट्विटरवरुन आलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करुन शाहरुखने अमेरिकेला जाण्याचे संकेत दिले आहेत. शाहरुखने या कार्यक्रमात जाण्यासाठी होकार तर दिलाच आहे. पण स्वखर्चाने या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे शाहरुखने ट्विटरवरुन जाहीर करुन टाकले आहे. सायन्स फिक्शन डिटेक्टीव शो -‘डिर्क जेंटली होलिस्टिक डिटेक्टिव एजन्सी’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात त्याला पाहुणा म्हणून बोलविण्यात आले आहे.

शाहरुख नकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रईस’ चित्रतपटाच्या यशामुळे फारच आनंदीत आहे. या चित्रपटानंतर शाहरुख इम्मियाज अली यांच्या चित्रपटातून झळकणार आहे. या चित्रपटामध्ये अनुष्का शर्मासोबत तो स्क्रिन शेअर करताना दिसेल. ज्यावेळी ट्विटरच्या माध्यमातून शाहरुखला या सिरिजच्या मालिकेत पाहुणा म्हणून बोलविण्यात आले त्यावेळी ‘डिर्क जेंटली होलिस्टिक डिटेक्टिव एजन्सी’ नावाच्या मालिकेची त्याला कल्पनाच नव्हती. खुद्द शाहरुखन ट्विटवरुन याबाबत कबुली दिली आहे. या मालिकेबद्दल असणाऱ्या अज्ञानाबद्दल त्याने खंत देखील ट्विटरवरुन व्यक्त केली.

या मालिकेच्या दुसऱ्या सत्रामध्ये शाहरुखते स्वागत आहे, असे ट्विट अरविंदने केले होते. शाहरुख खान ‘डिर्क जेंटली होलिस्टिक डिटेक्टिव एजन्सी’ टिव्ही सिरिजचा चाहता असल्याचा आनंद असल्याचे म्हटले आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये चांगलीच नावाजली जात आहे. ‘क्वांटिको’ या सिरीजच्या निमित्ताने प्रियांकाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचत प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली होती. या मालिकेच्या पहिल्या पर्वानंतर पुन्हा एकदा प्रियांका ‘क्वांटिको’च्या दुसऱ्या भागात देखील दिसत आहे. या सिरीजसोबतच ती चर्चेत आहे ते म्हणजे आभिनेता ड्वेन जॉन्सनसोबतच्या तिच्या आगामी चित्रपटामुळे. ‘बेवॉच’ या आगामी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियांका चोप्रा शिवाय बॉलिवू़ड मस्तानी दीपिका पदुकोणने देखील हॉलिवू़डमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या दोन अभिनेत्रींनतर आता शाहरुख खान अमेरिकेच्या मालिकेत दिसणार आहे.

याव्यतिरिक्त हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नावाजल्यानंतर अभिनेता शाहरुख खान पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतण्याच्या तयारीत आहे. पण, यावेळी तो कोणत्या रिअॅलिटी शोच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येत नाहीये. तर, एका वेगळ्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शाहरुख टेड टॉक्सचे हिंदी व्हर्जन असलेल्या एका व्हिडिओ सिरीजचे सूत्रसंचालन करणार आहे. विविध क्षेत्रातील काही कर्तृत्त्ववान आणि प्रेरणादाई संदेश देणाऱ्या चेहऱ्यांची ओळख या कार्यक्रमातून होणार आहे.