सेलिब्रिटींसारखं जगणं कोणाला आवडत नाही? पण सेलिब्रिटी होण्याचे जेवढे फायदे आहेत तेवढेच काही तोटेही आहेत. दिवसभर प्रसारमाध्यमांचे लक्ष त्यांच्यावर असते. बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने प्रसारमाध्यमांचे आपल्या जीवनातले अस्तित्व मान्य केले आहे. न्यूज १८ ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सतत फोटो काढत राहणे हा एक स्टारडमचा एक हिस्सा आहे, हे आतापर्यंत माझ्या कुटुंबियांनी स्वीकारले आहे. पण कोणत्याही सेलिब्रिटीसाठी हे एवढं कठीण नसतं जेवढं त्यांच्या मुलांसाठी होऊन जातं. यावर उपाय म्हणून शाहरुखने त्याची मुलगी सुहानाला अशा प्रसंगाला कसं सामोरं जायचं याबद्दल मोलाचा सल्ला दिलाय.

Jab Harry Met Sejal trailer : शाहरूख-अनुष्काची रोमॅण्टिक केमिस्ट्री

शाहरुखने सुहानाला सांगितले की, घराच्या बाहेर पडलो की आपले सतत फोटो घेतले जाणार. त्यामुळे जेव्हाही छायाचित्रकार येतील त्यांच्यासमोर सरळ उभं राहायचं. त्यांना फोटो काढू द्यायचे आणि त्यांचे फोटो काढून झाल्यानंतर, आता मी जाऊ का? असा प्रश्न विचारायचा. मग त्यांनाही गोष्ट कळून येते आणि ते आपल्याला जाऊ देता. मी त्यांना गेल्या २५ वर्षांपासून ओळखतो.

काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शाहरुखची मुलगी सुहानाला काही छायाचित्रकारांनी घेरले होते. अचानकपणे आलेले छायाचित्रकार पाहून सुहाना पुरती गोंधळून गेली होती. आपण नेमकी काय करावे?, कुठे जावे हेच तिला कळत नव्हते. या अनुभवानंतर शाहरुखचा हा सल्ला तिला खूप उपयोगी पडेल असेच म्हणावे लागेल.

दरम्यान, शाहरुखचा छोटा मुलगा अब्रामलाही आपल्या बाबांचे स्टारडम नक्की काय आहे ते कळायला लागले आहे. किंग खानचा मोठा मुलगा आर्यनने अब्रामला आपल्या बाबांच्या कामाबद्दल आणि त्यांच्या स्टारडमबद्दल अनेक प्रश्न विचारले होते. एक दिवस आर्यनने अब्रामला विचारलं, ‘तुला माहितीये का आपल्या बाबांना पाहून लोक हात का दाखवतात?’ त्यावरल अब्रामने काहीच उत्तर दिलं नाही. त्यानंतर आर्यनने त्याला विचारलं, ‘तुला माहितीये बाबा काय करतात? ‘त्यावर अब्राम म्हणाला, ‘हो… शूटींग करतात.’

जया बच्चन ठरल्या सर्वोत्कृष्ट संसदपटू; बिग बींनी केले कौतुक

आर्यनचा त्यापुढील प्रश्न होता, ‘बाबा कोण आहेत हे माहितीये,’ या प्रश्नावर अॅक्टर… (अभिनेता) असं एका शब्दात त्याने उत्तर दिलं. आर्यनच्या या प्रश्नावलीमधल्या एका प्रश्नाला अब्रामने दिलेलं उत्तर पाहता त्याच्यावर किंग खानचा असलेला प्रभाव लगेचच दिसून आला. सलग प्रश्न विचारणाऱ्या आर्यनने विचारलेल्या आणखी एका प्रश्न विचारला. ‘तुला माहितीये आपल्या बाबांना पाहण्यासाठी इथे (मन्नतजवळ) इतके लोक का येतात?,’ त्याच्या या प्रश्नावर अब्राम लगेचच उत्तरला, ‘हो… ते हॅण्डसम आहेत म्हणून लोक त्यांना पाहण्यासाठी येतात.’