बॉलीवूडचा ‘बादशाह’ शाहरुख खानच्या ‘रईस’ या चित्रपटाची सध्या भरपूर चर्चा आहे. चित्रपटाच्या टीझर, ट्रेलरलाही चांगली पसंती मिळाली. चित्रपटाच्या पोस्टर्समधील शाहरुखचा दमदार लूकपाहून चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता निर्माण झाली आहे. तर, आता शाहरुखने या चित्रपटातील तिची सहकलाकार आणि पाकिस्तानची अभिनेत्री महिरा खानला ‘आपण दोघं या चित्रपटात छान दिसू’ असं विश्वासाने सांगितलं आहे.
त्याचं झालं असं की, शाहरुखचा आगामी ‘दिलवाले’ चित्रपटातील शाहरुख-काजोल जोडीचं पोस्टर अभिनेत्री महिरा खानला भावलं. तिने लगेच शाहरुखला ट्विटरवर त्याबाबत कळवलं. तुमच्या दोघांची जोडी छान दिसत असल्याचे महिराने ट्विट केले. तर, शाहरुखने ‘आपणही ‘रईस’मध्ये एकत्र छान दिसू’, अशी प्रतिक्रिया महिराला दिली.
‘रईस’ चित्रपट पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात दाखल होणार असून या चित्रपटात शाहरुख दोन वेगवेगळ्या ‘लूक’मध्ये दिसणार आहे. ‘रईस’ चित्रपटाचा ट्रेलरही सध्या सोशल मीडियावर झळकत आहे. ‘रईस’चे पोस्टर आणि ट्रेलरच्या बाबतीत शाहरुखने ‘ट्विटर’वरून ‘केम छो, मजा आ रहा है, ये है रईस का पोस्टर, उम्मीद है आपको पसंत आएगा’ असे सांगत ‘जलेबी से तो मिठा मेरा हलवाई है’ असे ट्विट केले होते.