बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर हा दिवसांपूर्वीच बाबा झाला आहे. त्याच्या घरी एका छोट्या परिराणीचे आगमन झाले आहे. मीरा आणि शाहिदने त्यांच्या मुलीचे नाव मिशा असे ठेवले आहे. या दोघांनी त्यांच्या नावाच्या पहिल्या आद्याक्षरावरून मुलीचे नाव ठेवले आहे. मात्र, नुकताच बाबा झालेला हा अभिनेता आपल्या मुलीच्या जन्माने जितका आनंदी झाला आहे तितकाच तो थोडा घाबरलेलाही आहे. आपल्या मुलीने मोठं झाल्यावर बॉलीवूडमध्ये यावे असे त्याला अजिबात वाटत नाही. आपली मुलगी मोठी झाल्यावर बाबा, मला अभिनेत्री बनायचंय असं म्हणेल याची त्याला भीती वाटतेय.

बॉलीवूड चित्रटपसृष्टीत काम करणे खूप कठीण असल्याचे शाहिदला वाटते. याच कारणामुळे आपल्या मुलीने बॉलीवूडमध्ये तिचे करियर करावे असे शाहिदला वाटत नाही. असो, सध्या तरी मिशा या सगळ्यासाठी फार लहान आहे. ती केवळ दोन महिन्यांची आहे. मोठी झाल्यावर ती कोणत्या क्षेत्राकडे जाईल ते नंतर कळेलच. यावेळी शाहिदला त्याचे वडिल पंकड कपूर आवडतात का असाही प्रश्न करण्यात आला. तेव्हा शाहिद म्हणाला की, माझे वडिल एक महान आणि चांगले व्यक्ती आहेत. पण, त्याचसोबत ते अती काळजी घेणारे आणि शीघ्रकोपी आहेत. माझ्या मुलीसह मी तसं वागणार नाही अशी आशा करतो. आता तुला कळेल तुझ्याविरुद्ध माझ्याकडे कश्या तक्रारी यायच्या ते, असे माझे बाबा मला म्हणाले.

दरम्यान, शाहिद कपूर सध्या संजय लीला भन्सालीच्या पद्मावती चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यात तो दीपिका पदुकोणच्या पतीच्या म्हणजेच राजा रतन सिंगच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंगदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. तो  या चित्रपटामध्ये अलाउद्दिन खिल्जीच्या रुपात दिसेल.  या चित्रपटामध्ये अलाउद्दिन खिल्जीच्या रुपात दिसेल. याव्यतिरीक्त त्याचा रंगून हा चित्रपट येणार असून नुकतेच त्याचे चित्रीकरण पूर्ण झाले. यात कंगना रणौत आणि सैफ अली खान यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.