अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत त्यांच्या घरी येणाऱ्या नव्या पाहुण्यासाठी सज्ज झाले आहेत. चित्रपटांच्या व्यस्त कामांमधून वेळ काढत शाहिद शक्य तितका वेळ मीराला देत आहे. मीरा सोबतच्या घालवलेल्या अनेक क्षणांचे फोटो शाहिद त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करतच असतो. त्यामुळे शाहिद आणि मीरा हे बी टाऊनमधले अनेकांच्या पसंतीचे जोडपे म्हणूनही ओळखले जाते. शाहिदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पत्नी मीरा सोबतचा एक निरागस फोटो शेअर केला आहे. शाहिद आणि मीराचे हे गोड क्षण पाहण्यासाठी चाहत्यांमध्येही उत्सुकतेचे वातावरण आहे.
‘उडता पंजाब’ या चित्रपटाच्या चित्रीकरणातूनही शाहिदने वेळ काढून काही दिवसांसाठी मीरासोबत तो सुट्टीवर गेला होता. त्याने नुकतेच सोशल मीडियावर मीरा आणि त्याचा पोस्ट केलेला एक रोमॅण्टिक फोटो अनेकांच्या पसंतीस उतरला होता. आता शाहिदने त्याच्या गरोदर पत्नीसोबतचा एक फोटो पोस्ट करत त्याचा आनंद व्यक्त केला आहे. मीराच्या मांडीवर डोके ठेवत शेअर केलेल्या या फोटोला शाहिदने ‘मोमेंट्स’ असे कॅप्शन दिले आहे. सध्या शाहिद आणि मीरा एकमेकांसोबत वेळ घालवत असून येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे, अशी माहिती सुत्रांमार्फत मिळाली आहे.
‘उडता पंजाब’ या चित्रपटातील शाहिदच्या भूमिकेला रसिकांची प्रचंड पसंती मिळाली होती. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटाच्या निमित्ताने शाहित बऱ्याच काळानंतर ‘टॉमी सिंग’ च्या भूमिकेत झळकला होता. अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेल्यानंतर शाहिद कपूर मागच्या वर्षी ७ जुलैला मीरा राजपूतसह विवाहबंधनात अडकला होता. त्यानंतर शाहिद आणि मीरा अनेकदा प्रसारमाध्यमांसमोर एकत्र आले होते.

Moments

A photo posted by Shahid Kapoor (@shahidkapoor) on