बॉलिवूडचा अभिनेता शाहिद कपूर सध्या आगामी ‘रंगून’ चित्रपटाच्या प्रमोशमध्ये व्यग्र आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित चित्रपटामध्ये त्याच्यासह बॉलिवूड क्विंन कंगना रणौत आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. कंगना आणि सैफ सोबत पहिल्यांदा एकत्र काम करणाऱ्या शाहिदचा भारद्वाज यांच्यासोबत हा तिसरा चित्रपटआहे. आगामी ‘रंगून’ चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना शाहिदने चित्रपटाच्या चित्रीकरणावेळीचे काही अनुभव सांगितले. मिशाच्या जन्मानंतर ‘रंगून’ या चित्रपटातून पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी खास असल्याचे तो म्हणाला. शाहिद आणि मीराला काही दिवसांपूर्वीच कन्यारत्न झाले. चित्रीकरणातून वेळ काढून बऱ्याचदा शाहिदने पत्नी मीरा आणि मुलगी मिशासोबत वेळ घालविताना दिसला होता.

shahid-rangoon-759

replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण
Pune, School boy beaten,
पुणे : नदीपात्रात शाळकरी मुलाला मारहाण; विवस्त्रावस्थेतील चित्रफीत प्रसारित
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा

चित्रीकरणावेळीचे अनुभव सांगताना शाहिद म्हणाला की,  प्रत्येक नवीन चित्रपट हा नवीन आव्हाने घेऊन येत असतो. त्याप्रमाणे हा चित्रपट देखील आव्हानांनी भरलेला असा होता. चित्रपटासाठी अरुणाचलमध्ये चित्रीकरण करणे हे सर्वात मोठे आव्हान होते. सैफ अली खानसोबत काम करण्याचा अनुभव शेअर करताना शाहिदने त्याला चांगला आणि कुल अभिनेता असल्याचे प्रशस्तीपत्र दिले.  चत्रीकरणानंतर तो एकदम कुल असायचा, असे शाहिदने म्हटले. चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर शाहिद आणि कंगना यांच्यात शीतयुद्ध रंगल्याच्या अनेक बातम्या झळकल्या असल्या तरी कंगनासोबतचे व्यावसायिक संबंध उत्तम असल्याचे तो म्हणाला. तसेच कंगनासोबतच्या इंटिमेट सीन विषयीचा अनुभव देखील शाहिदने शेअर केला.

rangoon-e1487486460983

कोणालाही दलदलीत प्रेम करायला लागू नये, अशी मी देवाकडे प्रार्थना करेन. या भाषेत त्याने चित्रपटातील इंटिमेट सीन भयानक असल्याचे बोलून दाखविले. चित्रपटाच्या कथानकाच्या आवश्यकतेनुसार कंगना आणि शाहिद यांच्यात अनेक इंटिमेट सीन चित्रीत करण्यात आले आहेत. चिखलातील इंटिमेट सीन करणे फारच वेगळे होते. कथानकाला गरजेचे असणारे हे सीन करताना पंधरा ते सोळा किलो चिखल अंगावर असायचा. त्यामुळे प्रत्येक सीननंतर शॉवर घ्यावा लागायचा. या सीनच्या चित्रीकरणामुळे आजारी पडल्याचे सांगायला देखील तो  विसरला नाही.

कंगना रणौत आणि शाहिद कपूर

कंगनाने या चित्रपटासाठी अनेक बोल्ड सीन दिले आहेत. माझ्याशिवाय ही व्यक्तिरेखा अन्य कोणीही साकारू शकले नसते, असे ठामपणे बोलून दाखविणाऱ्या कंगनाने चित्रपटातील इंटिमेट सीनविषयी मजेदार किस्से यापूर्वी एका मुलाखती दरम्यान शेअर केले होते. चित्रपटामध्ये इंटिमेट सीन करणे मला कधीही आवडत नाही. इंटिमेट सीन करणे फारच कठीण गोष्ट असते. असे कंगना म्हणाली होती. या चित्रपटामध्ये कंगना सैफ आणि शाहिद कपूर यांच्यासोबत इंटिमेट सीन देताना दिसणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत कंगनाने कोणत्याही चित्रपटामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात इंटिमेट सीन दिलेले नाहीत.