बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानला आतापर्यंत अनेक शस्रक्रियांना सामोरे जावे लागले आहे. शाहरुखला पहिली मोठी शस्रक्रिया यश चोप्रा यांच्या ‘डर’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी करावी लागली होती. मुंबई फिल्म सिटीमध्ये १९९० मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना शाहरुखला गंभीर दुखापत झाली होती.. या चित्रीकरणामध्ये शाहरुखला कथानकाच्या मांडणीनुसार, अनुपम खेर यांच्या अंगावर झेप घ्यायची होती. शाहरुख खान सोफ्यावर झेप घेत असताना, अनुपम खेर स्वत:चा बचाव करण्यासाठी बाजूला सरकतात, असा तो सीन होता. यावेळी शाहरुखच्या छातीला चांगलाच मार बसला. आणखी एका चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी पहिल्या माळ्यावर उडी मारताना शाहरुखला डाव्या पायाच्या घोट्याला मार बसला होता. १९९३ मध्ये अॅक्शन सीन करत असताना शाहरुखला पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली. ही दुखापत देखील इतकी गंभीर होती की, त्याला यावर शस्रक्रिया करण्याची वेळ आली होती.

शाहरुखसोबतच्या अपघातांची मालिका ‘माय नेम इज खान’ या चित्रपटावेळी देखील पाहावयास मिळाली. या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी पायाच्या अंगठ्याला पूर्वीच्या जागी पुन्हा मार बसला. या अपघाताची शाहरुखला चांगलीच किंमत मोजावी लागली होती. तुम्हाला जर राकेश रोशन दिग्दर्शित ‘कोयला’ चित्रपटातील शाहरुखचा धावतानाचा सीन आठवत असेल तर या सीन वेळी तो घोट्याला लाल रंगाची ओढणी बांधल्याचे दिसले होते. घोट्याची दुखापत कमी करण्यासाठी शाहरुखने त्यावेळी ओढणीचा सहारा घेतला होता. माधुरी दीक्षितची ओढणी बांधून शाहरुखने तो सीन पूर्ण केला होता. या चित्रपटाचे चित्रीकरण हे अरुणाचल प्रदेशमध्ये करण्यात येत होते. चित्रीकरण टाळणे म्हणजे दिग्दर्शकाला मोठ्या आर्थिक फटका बसला असता, त्यामुळे जखमी होऊन देखील शाहरुखला हा सीन पूर्ण करावा लागला होता. शाहरुखचा हा अपघात १९९७ साली झाला होता.

‘शक्ती’ चित्रपटामध्ये शाहरुख खान  ऐश्वर्या रायसोबत  एका आयटम सॉंगवर थिरकताना दिसला होता. त्यावेळी त्याला पाठिच्या दुखण्याला सामोरे जावे लागले होते. २००१ मधील अपघातावर शाहरुख तब्बल २ वर्षे उपचार घेत होता. यासाठी त्याने इंग्लडच्या रुग्णालयात शस्रक्रिया देखील केली. २०१७ मध्ये दुल्हा मिल गया चित्रीकरणावेळी झालेल्या अपघातामध्ये डाव्या खांद्याला दुखापत झाली. सांध्याला जोरात मार बसला होता. या अपघातानंतर एका वर्षातच म्हणजे २००८ मध्ये ‘माय नेम इज खान’ च्या चित्रीकरणावेळी शाहरुखला पुन्हा डाव्या खांदा जायबंदी झाले. या अपघातामध्ये देखील शाहरुखने चित्रीकरण पूर्ण करण्यास प्राधान्य दिल्याचे दिसले. त्यानंतर ‘रावण’, फरहान अख्तरचा ‘हॅप्पी न्युअर’ आणि ‘चन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटामध्येही शाहरुखला गंभीर दुखापत झाली होती. अर्थात बॉलिवूडची बादशाहत टिकविण्यासाठी शाहरुखने घामच नाही, तर चित्रीकरणावेळी शरिरातील रक्तही आटवले आहे, असेच म्हणावे लागेल.