‘शेंटिमेंटल’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीतील धडाडीचे अभिनेते अशोक सराफ आणि त्यांच्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक समीर पाटील ‘लोकसत्ता लाइव्ह चॅट’च्या निमित्ताने लोकसत्ताच्या न्यूजरुममध्ये आले होते. यावेळी प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं देत या खास पाहुण्यांनी काही महत्त्वाच्या विषयांवरही त्यांची मतं मांडली. ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाला सेन्सॉरचा झालेला अडथळा पाहता गेल्या काही दिवसांपासून सेन्सॉर बोर्ड आणि चित्रपटसृष्टीमध्ये मतभेद वाढत असल्याचं लक्षात आलं आहे. चित्रपटाच्या कथानकाच्या अनुषंगाने दिग्दर्शक सिनेमॅटिक लिबर्टीचा आधार घेत कथानक आणखीनच रंजक बनवण्याचा प्रयत्न करतात. पण, ही सिनेमॅटिक लिबर्टी सेन्सॉरला मात्र बऱ्याचदा रुचत नाही.

मराठी चित्रपट आणि सेन्सॉर असा वाद तसा फार कमीच पाहायला मिळतो. पण, ‘शेंटिमेंटल’च्या बाबतीत चित्रपट प्रमाणित करताना सेन्सॉरने काही कठोर निर्णय घेतल्याचं म्हटलं जातयं. ‘शेंटिमेंटल’ या मराठी चित्रपटाच्या मार्गातही सेन्सॉरने आडकाठी आणल्याचं पाहायला मिळालं. त्याविषयीच प्रश्न विचारला असता दिग्दर्शिक समीर पाटील म्हणाले, ‘स्क्रीप्ट आणि चित्रपटाचं चित्रीकरण झाल्यानंतर मग चित्रपट सेन्सॉरपर्यंत पोहोचतो. बऱ्याचदा कसं होतं, सर्वच प्रेक्षकांना तुमचा चित्रपट आवडत नाही. तर काहीना मात्र हा चित्रपट फार आवडतो. त्यामुळे सेन्सॉरच्या बाबतीतही असंच आहे. सेन्सॉरमधील काही मंडळींना चित्रपट भावतो तर, काहींना त्यातील काही मुद्दे खटकतात. त्यामुळे त्यांच्यातील अंतर्गत वादाचा फटका आम्हाला बसतो.’

chamkila-movie-release-date
ठरलं! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार इम्तियाज अलीचा बहुचर्चित चित्रपट ‘अमर सिंह चमकीला’; वाचा कुठे पाहायला मिळणार?
Song from the movie Jaga Char Diwas produced by Jagruti Entertainment news
‘जगा चार दिवस’ चित्रपटाचा गीत ध्वनिमुद्रणाने मुहूर्त..
article-370-box-office-record
‘आर्टिकल ३७०’ने मोडला ‘द काश्मीर फाइल्स’चा रेकॉर्ड; पहिल्याच दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
naseeruddin-shah-bollywood
“मी हिंदी चित्रपट बघतच नाही कारण…”, नसीरुद्दीन शाह यांनी व्यक्त केली बॉलिवूडविषयी नाराजी

वाचा : मी चौकटचा नाही बदामचा राजा- अशोक सराफ

सेन्सॉरच्या या भूमिकेविषयी आणखी माहिती देत समीर म्हणाले, ‘बऱ्याचदा त्या मंडळीनी या गोष्टीचा आवाका न जाणताच चित्रपटासंबंधीचे निर्णय घेतलेले असतात. पण, त्यांनी आमचं म्हणणंही ध्यानात घेतलं पाहिजे. कारण, ही परिस्थिती उद्भवण्याचं कारण, म्हणजे सेन्सॉर आणि आमच्यामध्ये असलेली दरी.’ चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि सेन्सॉर यांच्यामध्ये असणारी ही दरी कमी होण्याची गरज असल्याचं मतही त्यांनी मांडलं.

वाचा : अशोक सराफ आणि सुनील गावस्करांच्या ‘या’ नाटकाबद्दल तुम्हाला माहित आहे का?

सेन्सॉरचा हस्तक्षेप आणि कलाकारांपुढे येणाऱ्या अडचणी या गंभीर विषयांवर बोलण्यासोबतच दिग्दर्शक समीर पाटील आणि अशोक सराफ यांनी बऱ्याच विषयांवर त्यांची मतं मांडली. प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं देत अशोकमामांनी काही जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या दिवसांपर्यंत ते अगदी शेंटिमेंटलपर्यंतच्या प्रवासापर्यंतचा उलगडा अशोकजींनी या लाइव्ह चॅटमध्ये केला. जवळपास चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी चित्रपटसृष्टीत मोलाचं योगदान देणारा हा अभिनेता २८ जुलैला ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वाचा : रंजनासारखी अभिनेत्री होणं नाही- अशोक सराफ