बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अॅम्बेसिडर बनवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेत आतापर्यंत अमिताभ बच्चन, सलमान खान, शंकर महादेवन आणि सचिन तेंडुलकर यांचा आधीच समावेश झाला आहे. आता या अभियानांतर्गत शिल्पा शेट्टी टीव्ही आणि रेडिओवरुन सर्वसामान्य जनतेला स्वच्छतेचे महत्त्व सांगणार आहे.

शहरी विकास मंत्रालयचे संयुक्त सचिव आणि स्वच्छ भारत अभियानाचे दिग्दर्शक प्रवीण प्रकाश यांनी सांगितले की, स्वच्छ भारत अभियानाचे लक्ष पूर्ण करण्यासाठी ते देशातील नावाजलेल्या व्यक्तिंना या अभियानाशी जोडत आहेत. शिल्पा शेट्टीचे एक अभियान लवकरच राष्ट्रीय स्थरावर सुरु होणार आहे. शहरात लोकांची सगळ्यात मोठी अडचण म्हणजे कचरा कुठेही आणि कसाही फेकला जातो. खासकरुन दुकानदार त्यांच्याकडील कचरा फेकण्यासाठी कचराकुंडीचा वापर करत नाहीत.

असे बोलले जाते की, प्रियांका चोप्राबरोबरही या अभिनयात सहभागी होण्याबद्दल विचारण्यात आले आहे. शिल्पाच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, तिचा ढिश्क्याऊं हा शेवटचा सिनेमा होता. या सिनेमाची निर्मितीही शिल्पानेच केली होती.

याशिवाय २००७ मध्ये आलेल्या लाइफ इन अ मेट्रो या सिनेमात शाइनी अहुजासोबत दिसली होती. याचसोबत सनी देओल आणि बॉबी देओल यांचा अपने या सिनेमात दिसली होती. सिनेमांशिवाय शिल्पाने डान्स रिअॅलिटि शो सुपर डान्सरची ती परिक्षकही आहे. शिल्पाने आरोग्य आणि स्वास्थ्यशी निगडीत एक वेबसाइटही सुरु केली आहे.

४१ वर्षांची शिल्पा या वयातही योगा आणि व्यायाम यापासून स्वतःला सुदृढ ठेवते. या वेबसाइटवर ती पोषक आहार आणि व्यायाम यांचे वेगवेगळे प्रकार सांगणार आहे. शिल्पाने राज कुंद्रासोबत लग्न केले आणि त्यांना विवान हा मुलगाही आहे. विवान आणि शिल्पाचे अनेक फोटो सोशल मीडियावर सतत येत असतात.