महाराष्ट्राला संगीत परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. संगीत महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. महाराष्ट्रातील एक सांगितीक घराणे ज्याला लोकसंगीतचा असाच वारसा लाभला आहे, या घराण्याच्या तब्बल पाच पिढ्या गेल्या अनेक वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. ज्या घराण्याने कव्वाली, पारंपरिक गाणी, भारुड, गोंधळ, प्रेम गीते इत्यादी गाऊन संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकली असे ‘शिंदे घराणे’. प्रल्हाद शिंदेपासून सुरु झालेला हा संगीत प्रवास आल्हाद शिंदे म्हणजेच त्यांच्या पणतूपर्यंत सुरु आहे. संगीत क्षेत्रामध्ये अशी घराणी दुर्मिळच असतात ज्यांना पाच पिढ्यांचा वारसा लाभतो. कलर्स मराठी पहिल्यांदाच या घराण्याला एकत्र घेऊन येणार आहेत ‘शिंदेशाही बाणा’ या कार्यक्रमामधून.

वाचा : PHOTO ४८ तासांत साकारलेल्या ‘पद्मावती’च्या रांगोळीची समाजकंटकांकडून नासधूस

feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी
Expansion of manufacturing companies in 14 cities due to spiritual tourism
आध्यात्मिक पर्यटनामुळे १४ शहरांत उत्पादक कंपन्यांचा विस्तार
Opposition parties criticized the BJP government in the Badaun double murder case
बदायूं दुहेरी हत्याप्रकरण, विरोधकांची टीका; परिचित नाभिकाचा पैसे मागण्यासाठी घरात प्रवेश

शेकडो लोकांनी भरलेले सभागृह, टाळ्यांचा कडकडाट, वाद्यांच्या ताफ्याने सजलेला रंगमंच आणि साथीला गाण्यातले धृवतारे. आनंद शिंदे ते आल्हाद शिंदे सगळे एकाच मंचावर येऊन गाणे सादर करणार आहेत. त्यामुळे ही संगीतमय संध्याकाळ प्रेक्षकांसाठी एक मेजवानी ठरणार हे नक्की. शिंदे घराणे त्यांच्या संगीत कारकिर्दीतील काही निवडक आणि लोकप्रिय अश्या गाण्यांचा नजराणा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात आनंद शिंदेनी काही सुप्रसिद्ध गाण्यांनी केली. यामध्ये ‘पार्वतीच्या बाळा’, ‘मोरया मोरया’ या गाण्यांचा समावेश होता. त्यानंतर लोकसंगीताच्या सोबतच भक्तीगीते, चित्रपट गीते म्हणून प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवणारा गायक आणि आनंद यांचा मुलगा आदर्श याने ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’, ‘अंबे कृपा करी’ यांसारखी गाणी गात कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवली. त्यानंतर त्याने ‘दुधात नाही पाणी’ ही अप्रतिम गवळण सादर केली.

वाचा : ‘सेलिब्रिटी रेसिपी’ सोनाली कुलकर्णी सांगतेय, तिच्या आवडत्या पदार्थाची रेसिपी

आनंद शिंदे आणि त्याचा भाऊ मिलिंद यांनी ‘ऐका सत्यनारायणाची कथा’ गाणे म्हणत प्रल्हाद शिंदे यांना मानवंदना अर्पण केली. उत्कर्ष शिंदे याने देखील त्याचे ‘घुंगराच्या तालामंदी’ आणि ‘चिमणी’ ही गाणी गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमामध्ये आनंद यांच्या नातवाने म्हणजेच आल्हादने गोड स्वरात आपल्या गाण्याची झलक उपस्थितांना दाखवली. संपूर्ण शिंदे परिवाराची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती. या कार्यक्रमाद्वारे प्रल्हाद शिंदेंपासून सुरु झालेला हा संगीतमय प्रवास प्रेक्षकांना ऐकायला मिळाला.

कार्यक्रमाची रंगत वाढविण्यासाठी शिंदे परिवाराला साथ दिली सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत आणि अमित राज यांनी. तसेच मयुरेश पेम, संस्कृती बालगुडे, तेजा देवकर यांनी अप्रतिम नृत्य सादर केले. ‘शिंदेशाही बाणा’ हा कार्यक्रम तुम्हाला २२ ऑक्टोबरला संध्या ६.३० वा. कलर्स मराठी वाहिनीवर पाहता येईल.