चित्रपट निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर याने डिस्ने इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हे पदभार सोडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या डिसेंबरपासून त्याने पदभार सोडण्याचा निर्णय घेतला असून तो स्वतःचा व्यवसाय सुरु करणार आहे. डिस्नेचे आंतरराष्ट्रीय मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अॅण्डी बर्ड यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. २००८ ते २०१२ या कालावधीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळणारे महेश समत हे पुन्हा एकदा या पदावर रुजू होणार आहेत. २८ नोव्हेंबरला ते अधिकृतपणे पदभार सांभाळतील.

अॅण्डी बर्ड यांनी त्यांच्या कर्मचा-यांना याविषयी ई मेलद्वारे माहिती दिली. जवळपास १२ महिन्यांपूर्वी सिद्धार्थने त्याला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची महत्वाकांक्षा असल्याचे सांगितले होते. याच कारणामुळे त्याने डिसेंबर महिन्यात संपणा-या त्याच्या कराराचे नुतनीकरण न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या संभाषणानंतर आम्ही सदर पदभार सांभाळण्याकरिता योग्य व्यक्तिच्या शोधाला लागलो. सिद्धार्थच्या जागी आता महेश समत हा पदभार सांभाळतील, असे अॅण्डी बर्ड म्हणाले.

Cops daughter commits suicide by making audiotape before suicide
मुंबई : आत्महत्येपूर्वी ध्वनीचित्रफीत तयार करून पोलिसाच्या मुलीची आत्महत्या
akola, after 3 months of victim death, Murder Case Registered, Akot Police Sub Inspector, murder case in akola, murder case, victim death, victim torture by police, crime news, akola news, marathi news,
पोलिसाच्या अमानुष मारहाणीत आरोपीचा मृत्यू; तीन महिन्यांनी गुन्हा दाखल
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

भारतीय चित्रपटसृष्टीत डिस्नेला भक्कम स्थानावर नेण्यात सिद्धार्थचा मोलाचा वाटा असल्याचे, बर्ड म्हणाले. २०१४ सालापासून डिस्नेसाठी असलेली सिद्धार्थची ओढ आणि जागरुकता यामुळे या ब्रॅण्डचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत गेला. सिद्धार्थच्या नेतृत्वाखाली डिस्नेने ‘पीके’, ‘जंगल बुक’ हे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. लहान मुलांना आवडणा-या कार्टुन चॅनेलमध्ये आजही डिस्ने पहिल्या स्थानावर आहे. सिद्धार्थने डिस्नेला दिलेल्या सेवेबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत आणि त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप सा-या शुभेच्छा..,असे बर्ड यांनी ई मेलमध्ये म्हटले आहे.

गेल्या महिन्यात सिद्धार्थ रॉय कपूर ‘द फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन प्रॉड्युसर’च्या अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेणार असल्याचे म्हटले जात होते. पण, याबाबतची कोणतीच अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या या पदावर मुकेश भट्ट आहेत.