करण जोहर दिग्दर्शित ‘स्टुडण्ट ऑफ द इयर’ चित्रपटाने प्रसिद्धीस आलेला बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा घटस्फोट मिळवून देणार असल्याचे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल ना. आता हे काय नवीन प्रकरण असे तुमच्या डोक्यात आले असेल. पण दचकून जावू नका. सिद्धार्थ काही खरोखरचं असे करत नाहीए.
सध्या सिद्धार्थ मल्होत्रा,आलिया भट्ट, परिणीती चोप्रा, करण जोहर, कतरिना कैफ, वरूण धवन आणि आदित्य रॉय कपूर ही संपूर्ण टीम ‘ड्रीम टीम टूर’निमित्त परदेशात गेली आहे. त्या दरम्यान आपल्या शोसाठी न्यू जर्सी येथे प्रवास करत असताना सिद्धार्थ मल्होत्राची नजर एका मजेशीर जाहिरातीच्या फलकावर पडली. ही जाहिरात चक्क घटस्फोट मिळवून देण्याची होती. या फलकावर ‘आपल्या जोडीदाराच्या सही शिवाय तुम्ही ३९९ डॉलरमध्ये घटस्फोट मिळवू शकता’ असे लिहण्यात आलेले होते. द डिव्होर्स सेंटर डॉट कॉम या संकेतस्थळाने ही जाहिरात दिलेली होती. सदर जाहिरात वाचून सिद्धार्थला राहावले नाही आणि त्याने या जाहिरातीच्या फलकाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यावर त्याने मोठी स्माइली टाकत ‘चांगल्या किंमतीत उत्तम ऑफर’ असे कॅप्शन दिले आहे.

Best offer at best price ! Hurry !😄 #newjersey roads

A photo posted by Sidharth Malhotra (@s1dofficial) on


‘ड्रीम टीम टूर’चा परदेश दौरा आता संपला आहे. या दरम्यान आपल्याला खूप चांगला अनुभव आल्याचे आणि सहका-यांसह काही सुंदर क्षण घालवल्याचेही सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर लिहले आहे. सध्या सिद्धार्थ आणि कतरिना कैफ त्यांच्या आगामी ‘बार बार देखो’ चित्रपटासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले आहे. त्यातील ‘काला चष्मा’ गाण्याला तर पाच कोटींपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.