सिनेमा म्हटला की तयारी आलीच. दिग्दर्शकापासून ते लेखकापर्यंत…निर्मात्यांपासून ते टेक्नीशिअन्सपर्यंत सगळेच आपले काम उत्तम व्हावे यासाठी धडपडत असतात. तर आपली भूमिका उत्तम पार पडावी यासाठी कलाकारही खास कष्ट करताना आपल्याला दिसतात. ‘पोश्टर गर्ल’ सिनेमासाठी सोनालीनेही बरीच मेहनत घेतली.
‘हात खाली, नजर खाली, फक्त नाव लक्षात ठेवायचं…’रूपाली’, म्हणत अख्या गावाला इंगा दाखवणारी ही ‘रूपाली थोरात’, आपल्या बिनधास्त आणि बेधडक अंदाजाने गावातल्या पुरूषांच्या नाकी – नऊ आणते. पोश्टर गर्लमधल्या रूपालीच्या भूमिकेविषयी बोलताना सोनाली म्हणते, की या भूमिकेसाठी तिने आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला. ज्यापध्दतीने त्यांनी एका छोट्या शहरातून आपली कारकीर्द सुरू करून आज एक उंची गाठली आहे, तशीच काही स्वप्न रूपालीचीही आहेत. एका छोट्या शहरातून आलेल्या रूपालीला खूप मोठे व्हायचे आहे. समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द तिच्यात आहे.’ शिवाय आयपीएस पाटील एका उंचीवर असूनही ते ज्यापध्दतीने आपल्या मातीशी जोडलेले आहेत, हे नक्कीच कौतुकास्पद असल्याचेही सोनाली म्हणाली.

Buldhana, Minor Girl, sexually Tortured, Case Registered, female friend,
बुलढाणा : अल्पवयीन मुलीला डांबून दहा दिवस अत्याचार; मैत्रिणीनेच दिला दगा….
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
satya pal malik
मोदी सरकारविरोधात बोलणं सत्यपाल मलिकांना भोवणार? सीबीआयच्या छापेमारीनंतर राजकीय चर्चांना उधाण!
Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह पुन्हा मिळू शकतं”, SC च्या वकिलांनी केलं स्पष्ट; म्हणाले…