चुंबन दृश्य देणे हल्लीच्या कलाकारांसाठी फार मोठी गोष्ट नसल्याचे जाणवते. असे असले तरी अशाप्रकारची दृष्ये देण्यासाठी संकोच करणाऱ्या कलाकारांसाठी चित्रपटात तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. दोन्ही कलाकारांची वेगवेगळी चित्रीत केलेली दृष्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने एकत्र जोडून चुंबन दृष्य साकारले जाते. या संदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ चांगलाच शेअर होताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री काजल अग्रवाल आणि दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या नजरेस पडतात. माध्यमांतील वृत्तानुसार २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मात्तरन’ या तामिळ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचे समजते. हिरव्या रंगाच्या स्क्रिनसमोर (क्रोमा) काजल चेंडूसारख्या गोलाकार वस्तुचे चुंबन घेताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. तर सूर्या एका काचेचे चुंबन घेताना दिसतो. नंतर स्पेशल इफेक्टसचा वापर करून काजल आणि सूर्याचे चुंबन दृष्य साकारण्यात येते.

व्हिडिओ पाहा –

kiss-shoot

kiss-shoot-2

kiss-shoot-1