कलाविश्वात करिअरच्या एका टप्प्यावर आल्यानंतर बऱ्याच अभिनेत्री आणि अभिनेते जीवनाच्या नवा वाटेचे वाटसरु होऊ पाहतात. अशाच एका टप्प्यावर पोहोचलेल्या अभिनेत्री संस्कृती शेणॉयचा नुकताच साखरपुडा झाला. सध्या सोशल मीडियावर या दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे फोटो बरेच चर्चेत आले आहेत. विष्णुसोबत संस्कृतीचा साखरपुडा झाला असून, यावेळी ती खूप छान तयार झाली होती. पारंपारिक दाक्षिणात्य पेहरावामध्ये संस्कृती फारच सुंदर दिसत होती. एका कौटुंबिक सोहळ्यात मित्रपरिवाराच्या उपस्थितीत तिचा साखरपुडा पार पडला.

हिंदी चित्रपटसृष्टीत संस्कृतीचा फार वावर नसला तरीही मल्ल्याळम, तेलगू, तमिळ आणि कन्नड चित्रपटसृष्टीत ती बरीच नावाजली आहे. लुकमन्स मॉडेल मॅनेजमेन्ट एजन्सीतून तिने मॉडेलिंग विश्वात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर ‘कल्याण सिल्क’ आणि बऱ्याच ब्रॅण्डच्या जाहिरातींमध्येही ती झळकली. तेलगू चित्रपटसृष्टीतून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. विविध चित्रपटांमध्ये तिने सहाय्यक अभिनेत्रीचीसुद्धा भूमिका साकारली आहे.

PHOTO : ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात

as-1

as4

‘माय फॅन रामू’ हा तिचा एक गाजलेला चित्रपट. ‘कट्टी पुली’ या तमिळ चित्रपटामध्ये तिची मुख्य भूमिकेसाठी निवड झाली होती. पण, आजीच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे चित्रपट अर्ध्यावर सोडूनच तिला परतावं लागलं होतं. दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये संस्कृती ‘विल अंबू’ आणि संगीतमय प्रेमपट असलेल्या ‘कन्ना’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

as7

assss