स्टार प्लस वाहिनीवरील ‘इश्कबाज’या मालिकेतून घराघरामध्ये पोहोचलेली टिया म्हणजेच अभिनेत्री नविना भोळेने अखेर आयुष्याच्या जोडीदारासोबत साखरपुडा केला आहे. नविना आणि तिचा प्रियकर जीत करण या प्रेमी युगलाचा नुकताच साखरपुडा सोहळा पार पडला. लवकरच ही जोडी विवाह बंधनात अडकणार आहे. दरम्यान, या जोडीने ‘प्री-वेडिंग’साठी खास फोटोशूट केले आहे. एवढेच नाही तर नविनाने तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियामध्ये लोकप्रिय असलेल्या इन्स्टाग्रामवरुन यातील काही फोटो शेअर देखील केले आहेत. नव्याचा चांगला चाहता वर्ग असून तिच्या प्री-वेडिंग’फोटोशूटला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. लग्नापूर्वी केलेले फोटोशूट चाहत्यांसाठी शेअर करताना या फोटोला नविनाने सुंदर कॅप्शन  देत आनंदी भावना व्यक्त केल्या आहेत.

आयुष्यात साथ देण्यासाठी निवडलेल्या जीतसोबत साखरपुडा झाला, याचा अजूनही विश्वास बसत नाही, असा उल्लेख तिने कॅप्शनमध्ये केला आहे. नविना आणि जीत या गोड जोडीचे फोटोशूट वेडिंससूत्र नावाच्या कंपनीने केले आहे. या कंपनीने त्यांचा एक व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे. नविनाविषयी अधिक सांगायचे तर, स्टार प्लस वाहिनीवरील ‘इश्कबाज’ या मालिकेमध्ये तिच्यासोबत शिवाय ओबेरॉय (नकुल मेहता), अंकिता (सुरभि चंदना) ही जोडी दिसते. या तिंघाच्याभोवती आधारित कथानकामध्ये नविना नकारात्मक व्यक्तिरेखा साकारताना दिसते. यापूर्वी दोघांनी साखरपुड्याचे काही फोटो देखील शेअर केले होते. स्टार प्लस वाहिनीवर सुरु असणाऱ्या मालिकेमध्ये टिया अर्थात नाविनाची भूमिका नकारात्मक असली तरी तिची व्यक्तिरेखा चांगलीच लोकप्रियता असल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये नविना हा कार्यक्रम सोडणार असल्याची वृत्ते झळकली होती. यावेळी नाविनाने मालिकेतून माघार घेऊ नये, यासाठी तिच्या चाहत्यांनी तिने मालिका सोडू नये, यासाठी पत्रे पाठवली होती. चाहत्यांच्यात असणारी तिच्याबद्दलचे प्रेम यावेळी दिसून आले होते.

या मालिकेमध्ये शिवाय आणि अनिका ही जोडी मुख्य भूमिकेत दिसत आहे. या शिवायचे लग्न टियासोबत होणार असते मात्र तिचा पूर्वीचा पती आल्यामुळे त्या दोघांचे लग्न होऊ शकत नाही. घरच्यांसाठी शिवाय टियाचा विचार न करता अनामिकाशी लग्न करताना दाखविले आहे. त्यानंतर टियाने शिवाय आणि अनामिका यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.