अभिनेत्री सोनम कपूर ही बॉलीवूडमधील केवळ प्रसिद्ध सेलिब्रिटी नसून तिची बरीच प्रशंसाही केली जाते. आपल्या मनात जे आहे तेच चेह-यावर दाखवणा-या व्यक्तिंपैकी ती एक आहे. ती कधीच उघडपणे कोणतीच गोष्ट बोलायला घाबरत नाही. पण यावेळी सोनम चर्चेत आली आहे ती तिच्या एका पोस्टमुळे. बझफीड इंडियाच्या पोस्टमध्ये तिने न घाबरता बॉलीवूडमध्ये सुरुवातींच्या दिवसांत तिच्यावर करण्यात आलेल्या टिप्पणी बद्दल उघडपणे सांगितले आहे. यात तिने स्त्रियांच्या शरीरयष्ठीवर होणारी टीका (बॉडी शेमिंग), स्ट्रेच मार्क, चित्रपटसृष्टीसाठी तिने केलेले कष्ट इतकेच नाही तर सार्वजनिक ठिकाणी अभिनेत्रींना भेट देण्यासाठी देण्यात येणारे मानधन यांसारख्या विषयांवर प्रकाश टाकला.

सोनमने तिच्या पोस्टमध्ये काय म्हटलेय?
पौगंडावस्थेत असताना इतर मुलींप्रमाणे मीदेखील माझ्या बेडरुममध्ये अनेक रात्री न्यूनगंडात घालवल्या. सोनम कपूर त्यावेळी जाड होती आणि त्या काळात इतर सर्वसामान्य मुलींप्रमाणेच आपल्याकडे कोणी आकर्षित व्हावे असा एकही गुण आपल्यात नाही. सुटलेलं शरीर, काळा रंग आणि जास्त उंची यामुळे सौंदर्याच्या सर्वसाधारण परिभाषेत न बसणारी मुलगी म्हणून पडणारे हे प्रश्न आपल्याला सतत छळत राहायचे, असे सोनमने पोस्टमध्ये म्हटले आहे. सर्व नातेवाईक एकत्र आल्यावर म्हणायचे की, ‘इतनी लंबी, इतनी काली, शादी कौन करेगा?’ यामुळे माझ्या मनात अधिकाधिक असुरक्षितता जाणवू लागली. पण त्यानंतर मी माझ्या चुकीच्या सवयींना आळा घालायचं ठरवलं. मी माझ्या डाएटला खूप गंभीरपणे घेऊ लागले. त्यामुळे तर मी एकदा दिवसभर केवळ अननस खाऊनही डाएट केलं होतं. त्यानंतर तास न् तास योगा करु लागले. यातून मी माझ्या चुकीच्या आहारपद्धती बदलल्या.
जाडेपणामुळे शरीरावर राहिलेल्या खुणा किंवा चट्टे यात काहीही वावगे नाही. उलट, आपण स्त्री म्हणून परिपक्व होत असल्याच्या त्या खूणा आहेत आणि त्यातचं स्त्रिचे खरे सौंदर्य दडलेले आहे असे सांगत सोनमने आयुष्यात कठीण प्रसंगांमध्ये तिला पाठिंबा देणा-या प्रत्येक स्त्रिचे आभार मानले आहेत.

In @anamikakhanna.in MUA @namratasoni styled by @shehlaakhan 📸 @thehouseofpixels

A photo posted by sonamkapoor (@sonamkapoor) on

👗rohitbal_ 💄 @artinayar 👭 @shehlaakhan 📸 @thehouseofpixels 👡 @needledust 💍 @kapoor.sunita

A photo posted by sonamkapoor (@sonamkapoor) on