बॉलिवूडमधील एकेकाळचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी याचा आज वाढदिवस. ‘बलवान’, ‘गोपी-किशन’, ‘मोहरा’, ‘हेरा-फेरी’ यांसारखे हिट चित्रपट देणारा सुनील ९०च्या दशकात स्टायलिश अभिनेत्यांमध्ये गणला जायचा. ‘इंडियाज असली चॅम्पियन’ या रिअॅलिटी शोच्या सूत्रसंचालनाची धुरा सध्या त्याच्या खांद्यावर आहे. बॉलिवूडचा ‘अण्णा’ म्हणजेच सुनीलबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

सुनीलचा जन्म मंगळुरु, कर्नाटक येथे झाला. लोक त्याला प्रेमाने ‘अण्णा’ असेही म्हणतात. जवळपास ११० चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या सुनीलचा १९९२ साली आलेला ‘बलवान’ हा पहिलाच चित्रपट होता. ‘मोहरा’, ‘दिलवाले’ आणि ‘गोपी किशन’ या चित्रपटांमुळे सुनीलला टॉपच्या अभिनेत्यांमध्ये स्थान मिळाले. किक बॉक्सिंगमध्ये ब्लॅक बेल्ट घेणारा तो पहिला बॉलिवूड अभिनेता आहे.

वाचा : कोणाचे रेस्तराँ तर कोणाची एअरलाइन्स, जाणून घ्या साउथ स्टार्सचे साइड बिजनेस

‘टक्कर’, ‘सपूत’,’कहर’ या चित्रपटांमध्ये सुनीलसोबत काम करणाऱ्या सोनालीचे त्याच्यावर क्रश होते. त्याच्यासोबत काम करत असतानाच ती त्याच्या प्रेमात पडली. मात्र, सुनीलचे आधीच लग्न झालेले होते. त्यामुळेच सोनालीचे हे प्रेम अर्धवट राहिल्याचे म्हटले जाते.

आजच्या घडीला सुनील चित्रपटसृष्टीत कार्यरत नसला तरी तो वर्षाला १०० कोटीपेक्षाही अधिक कमाई करतो. बार आणि क्लब व्यतिरीक्त त्याचे ‘पॉपकॉर्न एण्टरटेनमेंट’ हे प्रोडक्शन हाऊस आहे. तसेच कर्नाटक आणि इतर काही शहरांमध्ये त्याचे रेस्तराँ आणि हॉटेल चैन आहेत. त्याचे स्वतःचे बुटिकदेखील आहे. या सर्व व्यवसायातून त्याला कोट्यवधींची कमाई मिळते.

वाचा : जाणून घ्या, ‘घाडगे & सून’ मालिकेची कथा

सुनील शेट्टी खलनायकाची भूमिकादेखील उत्तम वठवतो. २००१ साली आलेल्या ‘धडकन’मधील खलनायकाच्या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आलेला.