सुष्मिता सेनच्या दुसऱ्या मुलीचा अलिशाचा सातवा वाढदिवस नुकताच पार पडला. तिने अलिशाचा वाढदिवस पहिल्यांदाच एवढ्या धुमधडाक्यात साजरा केला. ४० वर्षीय सुष्मिताने दोन मुलींना दत्तक घेतले आहे. मोठी मुलगी रिनी तर दुसरी मुलगी आलिशा.
आता मुलीचा वाढदिवस आणि सुश्मिता मजा मस्ती करणार नाही असे तर होणारच नाही ना? यावेळी तिने एका धमाकेदार पार्टीचे आयोजन केले होते. तिने इन्स्टाग्रामवर काही व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत.

सुष्मिताने अलिशाला २०१० मध्ये दत्तक घेतले होते. ती सात वर्षांची झाली असून ती मस्तीखोरही आहे. सुष्मिताच्या अनेक फोटोजमध्ये ती मस्ती करताना दिसत असते.

सुष्मिताने वयाच्या २५ व्या वर्षी मोठी मुलगी रिनेला दत्तक घेतले होते. ज्यावेळी सुष्मिताने रिनीला दत्तक घेतले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. रिनीनंतर आलिशाला तिने दत्तक घेतले. या तिघांचे असे स्वतःचे विश्व आहे, ज्यात या तिघीही खुप आनंदात आहेत. आलिशाच्या वाढदिवसा दिवशीही या तिघींना खुप मजा केली.