हल्लीच्या गाण्यांविषयी सांगायचं झालं तर बरेच कलागुणसंपन्न कलाकार संगीत क्षेत्रात त्यांचे योगदान देत आहेत. मुख्य म्हणजे या कलाकारांच्या कलागुणांना प्रेक्षकांचीही पसंती मिळत आहे. संगीत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजणाऱ्या गाण्याच्या दुनियेत एड शीरन हे असंच एक गाजणारं नाव. एड शीरनची गाणी सध्या अनेकांच्याच पसंतीस उतरत आहेत. त्याच्या काही गाजलेल्या गाण्यांपैकीच एक गाणे म्हणजे ‘शेप ऑफ यू’. अनेकांनाच थिरकायला लावणाऱ्या या गाण्याच्या चाहत्यांच्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडलीये, ती म्हणजे अभिनेत्री सुश्मिता सेनची. सुश्मिताने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये तिच्या मुलीसह ही विश्वसुदंरी ठेका धरताना पाहायला मिळतेय.

सध्या सुश्मिता सुटीचा आनंद घेत आहे. तिने पोस्ट केलेला हा व्हिडिओ म्हणजे अशाच काही आनंदाच्या क्षणांतील एक क्षण. या फोटोसह तिने सुरेखसे कॅप्शनही दिले आहे. इन्स्टाग्रामवरुनही बरेच फोटो अपलोड करत तिने चाहत्यांनाही या उत्साहात सहभागी करुन घेतले आहे. हा व्हिडिओ आणि त्यातील सुश्मिताचे तिच्या लेकीसोबतचे डान्स मुव्ह्ज पाहताना तुमच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य आल्यावाचून राहणार नाही. सध्या रुपेरी पडद्यापासून सुश्मिता दूर असली तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात आहे. ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरुन सुश्मिता नेहमीच विविध फोटो पोस्ट करत असते. एक अभिनेत्री म्हणून सुश्मिताने जितकी प्रसिद्धी आणि यश संपादन केले तितकेच यश सध्या ती एका आईच्या भूमिकेतून मिळवत आहे. ‘सिंगल मदर’ राहण्याच्या तिच्या निर्णयालाही चित्रपटसृष्टीमध्ये अनेकांनीच दाद देत तिचे कौतुकही केले होते.

Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
Hardik Emotional After Third Defeat
MI vs RR : ‘आम्ही लढत राहू आणि पुढे…’, सलग तिसऱ्या पराभवानंतर हार्दिक पंड्याची भावनिक पोस्ट व्हायरल
india bloc, india bloc rally
जागावाटपावरून मतभेद, तरीही व्यासपीठावर एकत्र; ‘इंडिया’ आघाडीकडून एकजूट दाखवण्याचा प्रयत्न?

वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी मिस युनिव्हर्सचा किताब पटकाविल्यानंतर महेश भट्ट यांच्या ‘दस्तक’ या चित्रपटातून सुश्मिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सुश्मिताचा ‘बीवी नंबर १’ हा चित्रपट फार गाजला होता. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कारही मिळाला होता. या चित्रपटानंतर तिने ‘आँखे’, ‘समय’, ‘मैं हूं ना’, ‘बेवफा’, ‘नो प्रॉब्लेम’, ‘मैने प्यार क्यू किया’ या चित्रपटांमध्ये काम केले होते.