मराठी चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेने प्रसिद्धीस आलेला अभिनेता सुव्रत जोशी यांच्या लग्नाचा एक फोटो सध्या फेसबुकवर फिरत आहे. अहो, गडबडून जाऊ नका. या दोघांनी काही खरोखर लग्न केलेल नाही. हा फोटो बघून काही जणांचा नक्कीच गोंधळ उडाला असेल यात शंका नाही. तर मृण्मयी आणि सुव्रतचा हा फोटो आगामी ‘शिकारी’ या चित्रपटातला आहे.

वाचा : जाणून घ्या, मराठी कलाकारांचे मानधन

boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
deep learning definition
कुतूहल : डीप लर्निग – सखोल शिक्षण म्हणजे काय?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

तुमचा लाडका अभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. ‘शिकारी’ या आगामी चित्रपटात हे दोघे दिसणार असून, नुकतेच चित्रपटाचे चित्रीकरमनण पूर्ण करण्यात आले. चित्रीकरणाचा शेवट सुव्रत आणि मृण्मयीच्या लग्नाच्या दृश्याने करण्यात आला. त्याच दरम्यानचे काही फोटो सुव्रतने फेसबुकवर शेअर केले आहेत. फोटोसोबत सुव्रतने एक पोस्टही लिहिली आहे. त्यात त्याने म्हटलेय की, ‘लहान असताना मी विचार करायचो जेव्हा चित्रपटात लोक लग्न करतात तेव्हा ते खऱ्या आयुष्यातही विवाहबद्ध होतात का? लोक या अशा पद्धतीने लग्न का करतात? असा प्रश्न मला मोठं झाल्यावर पडायला लागला. अशाच काही प्रश्नांची उत्तरं मला काल मिळाली. या वेड्या व्यक्तीसोबत काम करताना खूप मजा आली. लवकरच येतोय…. शिकारी’

या चित्रपटाची अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, मृण्मयीचं खऱ्या आयुष्यात गेल्या डिसेंबर महिन्यामध्येच लग्न झालं आहे. ‘नटसम्राट’, ‘कट्यार काळजात घुसली’ हे चित्रपट आणि ‘कुंक’, ‘अग्निहोत्र’ यांसारख्या मालिकेतील भूमिकांसाठी मृण्मयी नावाजली जाते. तर सुव्रत सध्या ‘दिल दोस्ती दुनियादारी २’ मालिकेत काम करत आहे. त्याचे ‘अमर फोटो स्टुडिओ’ हे नाटकही बरेच गाजत आहे. सुव्रतचाही काही महिन्यांपूर्वीच सखी गोखले हिच्याशी साखरपुडा झाला.