बंगाली सिनेमाची अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी हिच्या मते सेन्सॉर बोर्ड मुर्खासारखं कम करतं. कारण सेन्सॉर बोर्डाने तिच्या एका बंगाली सिनेमातील बोल्ड सीनला कात्री लावण्याचा सुचवले होते. स्वस्तिकाने सांगितले की, ‘साहेब बीवी और गुलाम’मध्ये माझी पत्नीची व्यक्तिरेखा ही दुसऱ्या व्यक्तिरेखेशी जोडली गेली आहे. माझी व्यक्तिरेखा ही सिनेमाच्या कथानकाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. माझ्या व्यक्तिरेखेला मारुन त्यांनी (सेन्सॉर बोर्ड) सिनेमाच्या मुळ कथानकालाच मारलं असतं. सेन्सॉर बोर्डच्या काही अधिकाऱ्यांचा मुर्खपणा नाहीए तर काय आहे.’
हिंदी सिनेमा ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्शी’ या सिनेमात काम केलेल्या स्वस्तिकाला वाटते की बोर्डाची वागणुक ही हट्टीपणाची आहे. त्यांनी सांगितले की महिला सेक्सबद्दल बोलू शकत नाही त्याचप्रमाणे सिनेमात माझी व्यक्तिरेखा ही सेक्सबद्दल बोलणारी अशी आहे. त्यांच्या विचारसणीमुळे प्रेक्षक आणि निर्मात्यांनी का नुकसान सहन करावे? ‘साहेब बीवी और गुलाम’ हा पूर्णपणे व्यावसायिक सिनेमा आहे.
सेन्सॉर बोर्डने जेव्हा ‘उडता पंजाब’ या सिनेमातून अनेक दृश्य काढण्याचे सुचवले तेव्हाही त्यांना टिकेला सामोरे जावे लागले होते. सेन्सॉर बोर्डाने अनुराग कश्यप याच्या उडता पंजाब या सिनेमातून पंजाब शब्द काढण्याचेही आदेश दिले होते. ज्यानंतर सिनेनिर्मात्यांनी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. उच्च न्यायालयाने एक दृश्य काढण्याच्या अटीवर सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी हिरवा कंदील दिला.
गेल्या दीडेक वर्षांतील अशा अनेक घटनांमुळे ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी)’ चांगलंच चर्चेत राहिलेलं आहे. चित्रपटांना केवळ प्रमाणपत्र असावं. कलाकृतीतील काटछाट बोर्डाने सुचवू नयेत इथपासून ते या मंडळाची गरजच काय अशा प्रकारच्या चर्चा या सेन्सॉर बोर्डाच्या कारभारावर होतच असतात.