अजयच्या ‘शिवाय’साठी काजोलची आगळी शक्कल

‘ताजमहाल’ हा बॉलीवूडसाठी नेहमीच जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा विषय राहिलेला आहे. अनेक हिंदी चित्रपटातून ‘ताजमहाल’च्या पाश्र्वभूमीवरील नायक-नायिकांची गाणी किंवा ‘ताजमहाल’ शब्द असलेली काही गाणी पाहायला मिळाली आहेत. अभिनेता अजय देवगण आणि काजोल या दाम्पत्यालाही ‘ताजमहाल’ची भुरळ पडली आहे. अजय देवगण निर्मित व दिग्दर्शित आगामी ‘शिवाय’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी काजोलने परिधान केलेल्या साडीवरील ब्लाऊजवर चक्क ‘ताजमहाल’ डिझाइन करण्यात आला होता.
अजय देवगणच्या अर्थातच पतीच्या या चित्रपटाच्या जोरदार प्रसिद्धीमध्ये काजोल सध्या व्यग्र आहे. अमेरिकेत या चित्रपटाची नुकतीच प्रसिद्धी करण्यात आली. या वेळी काजोलने जी साडी परिधान केली होती त्या साडीवरील काळ्या रंगाच्या ब्लाऊजवर चक्क सोनेरी नक्षीकामातून ताजमहालची प्रतिकृती साकारण्यात आली होती. प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाचीने ही साडी व त्यावरील ब्लाऊजचे खास ‘डिझाइन’केले होते. हा चित्रपट येत्या २८ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
Riteish Deshmukh post for brother father in law
आमदार भावाच्या सासऱ्यांसाठी रितेश देशमुखची खास पोस्ट, वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न