रॉक – रॅपच्या या जमान्यात हिंदी चित्रपट सृष्टीत आवाजाच्या दुनियेतील अभिजात देणगी लाभलेले गायक म्हणजे मोहम्मद रफी. चांगला माणूस आणि नेहमीच अनेकांच्या मदतीसाठी धावणाऱ्या रफीसाहेबांना बॉलिवूडमधून नेहमीच स्मरले जाते. गाण्यांव्यतिरिक्तही मोहम्मद रफी कार, खाण्यापिण्याविषयी देखील शौकिन होते. त्यांची गाणी आजही अनेकांच्या प्लेलिस्टचा भाग आहेत.  अशा या आवाजाच्या बादशहाचे व्हिजिटिंग कार्ड कसे असेल याबाबत अनेकांनाच कुतुहल असेल.

वाचा : तानाजी गलगुंडेला जॅकपॉट, लवकरच दिसणार हिंदी टिव्ही शोमध्ये

मोहम्मद रफींच्या अतिशय साध्या स्वरुपात असणाऱ्या या व्हिजिटिंग कार्डवर एका नोटेशनसह त्यांचे नाव आणि त्यांचा पत्ता छापलेला दिसत आहे. रफीसाहेबांच्या गाण्यांप्रमाणेच हे व्हिजिटिंग कार्डही त्यांच्या चाहत्यांसाठी आजच्या दिवशी एक अनोखी भेट ठरत आहे. शम्मी कपूर, ऋषी कपूर, देव आनंद आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक नायकांना आवाज देत सुरेख गाण्यांचा नजराणा देणाऱ्या मोहम्मद रफींनी त्या काळच्या जवळपास सर्वच संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले होते. रफीसाहेबांची गाणी कितीही ऐकली तरीही आपल्याही ओठांतून नकळतपणे ‘के दिल अभी भरा नही’ असेच भाव व्यक्त होतात.

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या

हे ऐकाच.. : अ‍ॅन इव्हनिंग इन लंडन
रफीसाहेबांचा जीवनपट कुठल्याशा कार्यक्रमात जावेद अख्तरसाहेबांनी आपल्यासमोर मांडला आहे. तो कार्यक्रम कुठला होता माहीत नाही, पण हा पाऊण तासांचा व्हिडीओ यू टय़ूबवर उपलब्ध आहे. जीवनपटच नाही, तर त्यांची गायकी, एका रसिकाच्या आणि विश्लेषकाच्या नजरेने जावेदसाहब आपल्यासमोर उलगडून दाखवतात, त्यांच्या गायकीतले बारकावे आपल्याला दाखवून देतात. रफीसाब महान होते हे आपल्याला माहितीच आहे, पण हा व्हिडीओ पाहिल्यावर त्यांच्या महानतेची अजून ठळकपणे जाणीव होते. तसेच काही वर्षांपूर्वी रफीसाहेबांचा पट्टशिष्य या नात्याने सोनू निगमने ‘अ‍ॅन इव्हनिंग इन लंडन’ या कार्यक्रमाद्वारे आपल्या गुरूला दिमाखात श्रद्धांजली वाहिली होती. हा कार्यक्रमसुद्धा यू टय़ूबवर आहे. सुमारे ७५ जणांचा सिंफनी ऑर्केस्ट्रा सोबत घेऊन सोनू निगमने गायलेली रफीसाहेबांची गाणी चुकवू नये अशीच आहेत.