सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्रींच्या फॅशन सोबतच गेल्या काही दिवसांपासून टेलिव्हिजन अभिनेत्रींचं स्टाईल स्टेटमेंटसुद्धा बरंच चर्चेत आहे. या अभिनेत्रींच्या यादीत ‘देवों के देव महादेव’ फेम अभिनेत्री मौनी रॉय सध्या आघाडीवर आहे. मौनी आणखी एका कारणामुळे चर्चेत असते ते म्हणजे तिचं खासगी आयुष्य. ‘देवों के देव…’ फेम सहकलाकार मोहित रैना याच्यासोबत मौनी रिलेशनशिपमध्ये होती. काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात होतं.

पण, त्या बहुधा अफवाच असाव्यात. कारण, दिवाळीच्या उत्साही वातावरणात मौनी आणि मोहितचे काही फोटोच यामागचं वास्तव सर्वांसमोर आलं आहे. दिवाळीच्या निमित्ताने मौनीने काही खास क्षण तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीसोबत म्हणजेच मोहितसोबत आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत व्यतीत केले. यावेळी मौनी आणि मोहितकडे पाहता त्यांच्या नात्यात कोणत्याही प्रकराचा तणाव नसून सर्वकाही सुरळीत सुरु असल्याचंच स्पष्ट झालं. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाचीच बाब आहे असं म्हणायला हरकत नाही.

https://www.instagram.com/p/Bae10l5l9bV/

वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा

इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या एका फोटोमध्ये मोहित कॅमेराकडे पाहत असला तरीही मौनी मात्र त्याच्याकडे पाहण्यात गुंग असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. त्यांचा हा फोटो पाहून पुन्हा एकदा या सर्वांच्या आवडत्या जोडीचे ‘कपल गोल्स’ चर्चेत आले आहेत. मोहित आणि मौनी सध्याच्या घडीला टेलिव्हिजन विश्वातील ‘मोस्ट हॅपनिंग कपल’ ठरत आहेत. त्यांच्यावर माध्यमांच्याही कायम नजरा असतात. त्यामुळे सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट पोस्ट करताना हे दोघंही बरीच सजगता बाळगतात. पण, काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न केला तरीही त्या लपत नाहीत, असंच काहीसं सध्या मोहित- मौनीसोबत घडत आहे. त्यातही मौनीला नेहमीच तिच्या कामात प्रोत्साहन देणारा मोहितसारखा साथीदार असताना त्यांच्या नात्यात दुरावा येऊच शकत नाही, असाच असंख्य चाहत्यांचाही विश्वास आहे.

https://www.instagram.com/p/BafELcVlXdO/