बॉलिवूडमध्ये सध्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटाचीच चर्चा असल्याचे दिसते. पद्मावतीची घोषणा झाल्यापासून ते अगदी चित्रीकरण सुरु असेपर्यंत या चित्रपटाविषयी काही ना काही वाद समोर येतच आहेत. सध्या दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर या चित्रपटासाठी मुंबईत चित्रीकरण करत असून, ‘पद्मावती’ यावर्षी नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध प्रेमीयुगुल असलेले दीपिका आणि रणवीर यात राणी पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांचेही चाहते त्यांना रुपेरी पडद्यावर पुन्हा एकत्र पाहण्यासाठी उत्सुक असतील यात शंका नाही. तुम्हाला माहितीये का, काही वर्षांपूर्वी या भूमिकांसाठी पूर्वाश्रमीचे प्रियकर असलेल्या ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान यांना विचारण्यात आले होते. पण या दोघांचा ब्रेकअप झाल्यामुळे हा चित्रपट बारगळला.

वाचा : …म्हणून सलमान खानच्या घरी यावर्षी बाप्पा येणार नाही

एका मासिकाच्या लेखात दिलेल्या माहितीनुसार, सलमान आणि ऐश्वर्याचा ब्रेकअप होऊनही हे दोघे चित्रपटासाठी एकत्र येतील अशी संजय लीला भन्साळींना आशा होती. त्यामुळे त्याने दोघांनाही चित्रपटासाठी विचारले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऐश्वर्याने चित्रपटासाठी होकारही दिला होता. सलमानने जर अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका केली तर मी चित्रपटात काम करण्यास तयार आहे, असे ऐश्वर्याचे म्हणणे होते. कारण चित्रपटात पद्मावती आणि अल्लाउद्दीन यांचे एकही दृश्य एकत्र नव्हते. अपेक्षेप्रमाणे सलमानने मात्र चित्रपटात काम करण्यास नकार दिला.

वाचा : बिग बॉस ११ अन् सलमानला भाभी म्हणाली बेशरम

सलमानच्या जवळच्या सूत्रांनी मासिकाला दिलेल्या माहितीनुसार, ‘पद्मावती’ हा प्रेमकथा असल्यामुळे तो चित्रपटात काम करण्यासाठी खूप उत्सुक होता. ‘हम दिल दे चुके सनम’मध्ये सलमान – ऐश्वर्याची रोमॅण्टिक केमिस्ट्री पाहावयास मिळाली होती. पण, ‘पद्मावती’मध्ये त्याला खलनायकी भूमिका मिळाल्यामुळे त्याने चित्रपटास नकार दिला. अखेर यामुळे संजय लीला भन्साळीच्या पदरी निराश पडली.