नोटाबंदी हा सध्या देशात चर्चेचा विषय आहे. गेल्या महिन्यात आपण अनेकांना बँक आणि एटीएमबाहेर रांगेत उभे राहिलेले पाहिले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे अभिनेता अनिल कपूरलवरही एटीएमच्या रांगेत उभं राहण्याची वेळ आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार आणि पाचशेच्या नोटा बंद केल्यापासून आपणा सर्वांनाच कुठेतरी आता रांगेत उभं राहण्याची सवय झाली आहे.

एटीएमच्या रांगेत उभं असताना चाहत्यांसोबत काढलेला सेल्फी अनिल कपूरने शेअर केला आहे. अनिलने आपल्या चाहतीचे ट्विट रिट्विट करत लिहले की, एटीएमच्या रांगेत उभं असताना काढलेला सेल्फी. नोटाबंदीसाठी धन्यवाद. मला या सुंदर माणसांना भेटण्याची संधी मिळाली.

एटीएमच्या रांगेत उभं असताना आपले कर्तव्य समजत अनिल कपूरने चाहत्यांना त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा आनंद दिला. दरम्यान, त्या चाहतीने हा सेल्फी शेअर करत आपला आनंद जाहीर केला. नोटाबंदीमुळे एटीएम बाहेर लागलेल्या लांबच लांब रांगामध्ये उभे राहण्याचे आणि दैनंदिन व्यवहारात येणा-या अडथाळ्यांचे दुःख यात अजिबात दिसून येत नाही, असेही तिने ट्विटमध्ये म्हटले.

दरम्यान, नोटापुरवठा करताना रिझव्‍‌र्ह बँकेने व्यावसायिक आस्थापना, कार्यालये असलेल्या भागांतील बँकांना दिलेले झुकते माप आणि त्याचवेळी बहुतांश ठिकाणच्या एटीएममध्ये असलेला खडखडाट असा डिसेंबर महिन्यातील पगाराचा दिवस सामान्यजनांना गुरुवारी बघावा लागला. हा मनस्ताप कमी म्हणून की काय, नोटादुष्काळ आणखी दोन-तीन आठवडे नागरिकांना सहन करावा लागेल, असे सूचित करणारे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० च्या नोटा दैनंदिन व्यवहारातून रद्द करण्याचा निर्णय घेऊन आता बरेच दिवस उलटले आहेत. पण, अद्यापही बॅंका आणि देशातील इतर दैनंदिन व्यवहारांमध्ये सुसूत्रता आलेली दिसत नाहीये. मोदीजींच्या या निर्णयामुळे सर्वच क्षेत्रांवर त्याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. त्यातीलच एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणचे चित्रपटसृष्टी. बॉलिवूडमध्येही पंतप्रधानांच्या या निर्णयामुळे चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. काही चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या तारखाही पुढे ढकलण्यात आल्या होत्या. ही सर्व परिस्थिती पाहता आपल्या आगामी ‘दंगल’ या चित्रपटाला नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका बसू नये अशी आशा अभिनेता आमिर खानने काही दिवसांपूर्वची व्यक्त केली होती. ‘दंगल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पाहता तोपर्यंत सर्व परिस्थिती पूर्ववत होईल अशी आशाही मिस्ट परफेक्शनिस्ट आमिर खानने व्यक्त केली आहे. ‘मी आशा करतो की याचा (नोटाबंदीच्या निर्णयाचा) चित्रपटावर काहीही फरक पडणार नाही. माझ्यामते आता हळूहळू सर्व काही पूर्वपदावर येत आहे. ‘रॉक ऑन २’ या चित्रपटावर त्याचा परिणाम झाला होता. कारण, तो चित्रपट नोटाबंदीच्या निर्णयाच्या तारांबळीच्याच वातावरणात प्रदर्शित झाला होता. पण ‘डिअर जिंदगी’च्या बाबतीत तसे झाल्याचे मला वाटत नाही. त्यामुळे आता मी आशा करतो की, माझ्या चित्रपटावर याचा परिणाम होणार नाही’, असे आमिर म्हणालेला.