विनोदवीर कपिल शर्माच्या मागचे दृष्टचक्र काही केल्या संपत नाही असेच म्हणावे लागेल. मध्यंतरी द कपिल शर्मा शो टीआरपीच्या शर्यतीत टॉप १० मध्ये होता. पण आता हा कार्यक्रम पुन्हा एकदा मागे फेकला गेल्यामुळे कपिलच्या चिंतेत वाढ झाली आहे. कार्यक्रमाची टीआरपीमध्ये होणारी घसरण पाहता कपिलने आपल्या मानधनात घट केली आहे. तर दुसरीकडे सुनील ग्रोवरचे सुगीचे दिवस आले आहेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

माझी नसबंदी निसर्गही करु शकत नाही- धर्मेंद्र

‘डीएनए’ वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, विनोदवीर सुनील ग्रोवरने आपल्या मानधनात वाढ केली असून तो आता एका भागासाठी १३ ते १४ लाखांची मागणी निर्मात्यांकडे करतोय. याआधी सुनील द कपिल शर्मा शोच्या एका भागाच्या चित्रीकरणासाठी सात ते आठ लाख रुपयांचे मानधन घ्यायचा. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिलला सध्या अनेक कार्यक्रमांचे प्रस्ताव येत आहेत. पण सध्या तो कोणत्याही कार्यक्रमात पाहुणा कलाकार म्हणून जायला आणि अधिकाधिक स्टेज शो करायला प्राधान्य देत आहे.

बीएआरसीने दिलेल्या अहवालानुसार या आठवड्यात ‘द कपिल शर्मा शो’ चे नाव टॅाप १० च्या यादीतून घसरलेय. कपिल शर्माचे स्टारडमही यामुळे धोक्यात आले आहे असे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. गेले कित्येक दिवस कपिल आजारी असल्यामुळे कार्यक्रमाचे चित्रीकरण रद्द करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी शाहरूख खान ‘जब हॅरी मेट सेजल’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये जाणार होता. पण त्याआधीच कपिलची तब्येत खालावल्यामुळे त्या दिवसाचे चित्रीकरण रद्द करण्यात आले. असाच काहीसा किस्सा ‘मुबारका’ सिनेमाच्या टीमसोबतही घडला. ‘मुबारका’ टीमने तब्बल चार तास कपिलची वाट पाहिली. पण तो रात्री १० पर्यंत न आल्यामुळे त्या दिवसाचेही चित्रीकरण रद्द करण्यात आले.

चाहत्याच्या त्या कृतीवर भडकला खिलाडी कुमार

एकामागून एक घडणाऱ्या या सर्व घटनांमुळे कपिल शर्माचा शो बंद होईल की काय, असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित झाला आहे. पण या संदर्भात बॉलिवूड लाइफला दिलेल्या मुलाखतीत किकू शारदा म्हणाला की, ‘कपिल शर्मा आजरपणामुळे सेटवर येऊ शकत नाही. प्रेक्षकांकडून केल्या जाणाऱ्या अंदाजाला मी कोणतीही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. मी फक्त एवढंच सांगेन की आगामी आठवड्याच्या चित्रीकरणाला आम्ही सुरूवात केली आहे.’